हिच का खिलाडूवृत्ती? चेन्नईला हरवताना मुंबईने केलेली चिटींग आली समोर

दिल्ली: आयपीएल 2021 च्या 27 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा रोमांचक सामन्यात 4 गडी राखून पराभव केला. पहिल्या डावात चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 218/4 अशी मोठी धावसंख्या उभारली, त्या प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सने सामन्याचा शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. कीरोन पोलार्डने 34 चेंडूत 87 धावा फटकावल्या. त्यालाच सामनावीर म्हणून निवडले गेले.

शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावा आवश्यक असताना पोलार्डने दोन चौकार व एक षटकार मारला. शेवटच्या चेंडूवर 2 धावा काढत पोलार्डने मुंबईला विजयी केले. किरॉन पोलार्डने 34 चेंडूत 87 धावांचा शानदार डाव खेळला आणि शेवटच्या चेंडूवर संघाला दमदार विजय मिळवून दिला.

परंतू मुंबईच्या विजयावर आता टिका होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू ब्रॅड हॉगने मुंबई इंडियन्स संघाच्या खेळ भावनेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हॉगने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो अपलोड केला ज्यामध्ये त्याने फलंदाजांना क्रिकेटमध्ये अधिक फायदा मिळतो असे म्हटले आहे.

या सामन्यात शेवटच्या चेंडूवर मुंबईला जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता होती. लुंगी अँगिडी चेन्नईकडून अखेरच्या षटकात गोलंदाजी करत असताना, नॉन-स्ट्राइकला उभा असलेला धवल कुलकर्णी धाव घेण्यासाठी क्रीझच्या पुढे खूप पुढे गेला होता.

तेच चित्र शेअर करत हॉगने लिहिले की, ‘पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केल्याबद्दल क्षमस्व. रात्रीच्या सामन्यात मुंबईला शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती. नॉन-स्ट्राइक एंड फलंदाजाने याचा गैरफायदा घेतला आणि क्रीजच्या पुढे गेला,हे  बरोबर आहे का? अशाप्रकारे त्याने मुंबईच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली.

तत्पूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि जयंत यादव आणि नॅथन कूल्टर-नाईलच्या जागी जेम्स नीशम आणि धवल कुलकर्णीला स्थान दिले. चेन्नई सुपर किंग्जच्या अखेरच्या सामन्यातील संघात कोणताही बदल झाला नाही.

चेन्नईला चांगली सुरुवात मिळाली नव्हती आणि ट्रेंट बाउल्टने पहिल्याच षटकात रितुराज गायकवाडला बाद केले. पण त्यानंतर मोईन अलीने फाफ डू प्लेसीबरोबर दुसर्‍या विकेटसाठी 108 धावांची जबरदस्त भागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या दिली.

मोईन अलीने 36 चेंडूत 58 धावा फटकावल्या, तर फाफ डु प्लेसीने 28 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. 11 व्या षटकात जसप्रीत बुमराहने मोईन अलीला बाद केले आणि त्यानंतर 12 व्या षटकात सलग दोन चेंडूंत किरॉन पोलार्डने फाफ डू प्लेसी आणि सुरेश रैनाला बाद करून चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का दिला.

इथून अंबाती रायुडूने रवींद्र जडेजाबरोबर पाचव्या विकेटसाठी 102 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला 200 च्या पुढे नेले. रायडूने 27 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 72 धावांची शानदार नाबाद खेळी साकारली. रवींद्र जडेजाने 22 चेंडूंत नाबाद 22 धावा केल्या. शेवटच्या 5 षटकांत चेन्नई सुपरकिंग्जने 82 धावा केल्या.

मोठ्या लक्ष्याच्या उत्तरात मुंबई इंडियन्सला क्विंटन डी कॉक 38 आणि रोहित शर्मा 35 यांनी चांगली सलामी दिली. तर पॉवरप्लेच्या 6 षटकांत  58 धावा केल्या. शार्दुल ठाकूरने रोहितला टिपले. तो बाद झाला आणि त्यानंतर नवव्या षटकात जडेजाने सूर्यकुमार यादवला बाद केले. 10 षटकानंतर मुंबई इंडियन्सचा स्कोअर 81/3 होता. आणि मुंबई इंडियन्सला विजयासाठी 60 चेंडूत 138 धावांची आवश्यकता होती.

येथून पुढे किरोन पोलार्डने सामना आपल्या हातात घेतला. आणि अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पोलार्डने क्रुणाल पांड्या (23 चेंडू 32) च्या चौथ्या विकेटसाठी 89 धावांची जबरदस्त भागीदारी केली. 17 व्या षटकात क्रुणाला सॅम करणने बाद केले.

मुंबई इंडियन्सने 19 व्या षटकात 200 चा आकडा ओलांडला, परंतु त्याच षटकात 202 च्या स्कोअरवर सॅम करणने हार्दिक पंड्या (7 चेंडू 16) यांना बाद केले. त्याच षटकात करणने जेम्स नीशम (0) यांनाही 203 धावांवर बाद केले.

महत्वाच्या बातम्या
बॅण्ड पथकात लावणी म्हणणाऱ्या चिमुकलीने सोशल मिडियावर घातला धुमाकूळ; पाहा व्हिडिओ
पत्नीच्या नकळत पतीने बसवला घरात कॅमेरा, नंतर समोर आला हा घाणेरडा प्रकार
इंडियन आयडलकडून प्रेक्षकांची मोठी फसवणूक, गरीब सायली कांबळेबाबत झाला हा धक्कादायक खुलासा
मुलगा बाबीलने सांगितली इरफान खानच्या मृत्यूची दर्दनाक कहाणी; वाचून डोळ्यात पाणी येईल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.