आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या रंगतदार सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग सात सामन्यात एका संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. तो संघ मुंबई इंडियन्स ठरला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स((Mumbai Indians)संघाच्या आयपीएल २०२२ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा मावळल्या आहेत.(Mumbai Indians became the first team to achieve this fea
मुंबई इंडियन्स आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये जाईल का? असा प्रश्न मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना पडला आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्स विरुद्धचा कालचा सामना जिंकला असला तरी देखील त्यांची प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता ४.८ टक्के इतकी आहे. चेन्नईचे गुणतालिकेत ४ गुण आहेत. गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स ९ व्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एकही सामना जिंकला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सची प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता ०. ८९२ टक्के आहे. मुंबई इंडियन्स संघाचे गुणतालिकेत शुन्य गुण आहेत. त्यामुळे गुणतालिकेत मुंबई इंडियन्स संघ शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे. गुणतालिकेत १० गुणांसह गुजरात संघ अव्वल स्थानावर आहे.
त्यानंतर गुणतालिकेत बंगळूरचा संघ आहे. गुणतालिकेत राजस्थान संघाचे ८ गुण आहेत. तसेच लखनऊ आणि हैदराबाद संघाचे देखील ८ गुण आहेत. दिल्ली आणि कोलकत्ता संघाचे ६ गुण आहेत. त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी मुंबई इंडियन्सला आयपीएल स्पर्धेमधील उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.
चेन्नई विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करत १५५ धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्स संघाकडून तिलक वर्माने सर्वात जास्त ५२ धावा केल्या होत्या. तर सूर्यकुमार यादवने ३२ धावा केल्या होत्या. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि डावखुरा फलंदाज इशान किशन पहिल्याच षटकात बाद झाले होते.
चेन्नई सुपर किंग्स संघाचा गोलंदाज मुकेश चौधरीने त्यांना बाद केले होते. १५५ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरवात खराब झाली होती. चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज ऋतुराज गायकवाड लवकर बाद झाला. या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर महेंद्रसिंग धोनीने चौकार मारला आणि चेन्नई सुपर किंग्स संघाला विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या :-
सुरवातीला केवळ १०० रुपयांत घर विकत घेतलं, पण नवीन घरात जाताच पायाखालची जमीनच सरकली
..त्यावेळी काही सैनिकांनी मला चुकीच्या अवस्थेत पाहिलं होतं, करण जोहरने सांगितला लाजिरवाणा किस्सा
‘या’ शुगर स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे आयुष्य झाले गोड, वर्षभरात दिला तब्बल ४४० टक्के परतावा