मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्का! पुढच्यावर्षी मुंबईच्या ताफ्यात हे दोन स्टार खेळाडू नसणार?

आयपीएल २०२१ मधील मुंबई इंडियन्सचा प्रवास निराशाजनक होता, ५ वेळा चॅम्पियन राहिलेला संघ यावर्षी स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. असे असतानाचा आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता पुढच्या वर्षी मेगा लिलाव होणार आहे, नियमांनुसार ३ खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची परवानगी आहे.

मुंबई या ३ खेळाडूंना कायम ठेवेल
आयपीएल २०२२ मेगा लिलावासाठी सर्व संघांनी एक योजना तयार केली आहे. मुंबई इंडियन्सने पुढच्या वर्षी ज्या खेळाडूंना संधी द्यायची आहे त्यांनाही शॉर्टलिस्ट केले असेल. चला त्या ३ स्टार खेळाडूंवर एक नजर टाकू ज्यांना मुंबई फ्रँचाइजी कायम ठेवू शकते.

१. रोहित शर्मा
कर्णधार रोहित शर्मा कायम ठेवण्यात येणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिले नाव असेल यात शंका नाही, त्याच्या नेतृत्वाखाली संघाने ५ वेळा चॅम्पियन ट्रॉफी मिळवली आहे. त्यामुळे फ्रँचायझी ‘हिटमॅन’च्या नेतृत्व गुणवत्तेबद्दल पूर्णपणे चिंतित आहे.

२. सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादवने कदाचित आयपीएल २०२१ मध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नसेल, त्याने १४ सामन्यात ३१७ धावा केल्या आहेत, पण तो मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत आहे. याचे कारण असे की सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध शेवटच्या साखळी सामन्यात सुर्यकुमारने जबरदस्त खेळी खेळली होती. तसेच त्याला आता टी-२० विश्वचषकाचा अनुभवही असणार आहे.

३. जसप्रीत बुमराह
मुंबई इंडियन्स जसप्रीत बुमराहला कायम राखेल कारण तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे आणि संघाचा स्टार खेळाडू आहे. बुमराहने आयपीएल २०२१ च्या १४ सामन्यांमध्ये २१ विकेट्स घेतल्या होत्या, त्याचा इकॉनॉमी रेट ८ पेक्षाही कमी होता.

या ‘मॅच विनर’ला झटका मिळणार का?
केवळ ३ खेळाडूंना कायम ठेवण्याच्या सक्तीमुळे, ईशान किशनचे नाव या यादीत समाविष्ट करणे कठीण आहे, पण ईशानला निराश होण्याची गरज नाही. कारण मुंबई फ्रँचायझी लिलावात त्याला संघाला परत समाविष्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तसेच रिटेनच्या लिस्टमध्ये ३ नाव असल्याने हार्दिक पांड्यालाही लिलावात असावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
वर्षभरात नोकरी जाणार, जेलमध्ये सडणार, नवाब मलिकांच्या धमकीवर वानखेडेंनी दिले ‘हे’ उत्तर
मोदींसोबत बैठकीत काय चर्चा झाली? राकेश झुनझुनवाला म्हणाले, सुहागरात्रीवेळी बायकोसोबत…
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रामध्ये वाद? पती आदित्यच्या ‘त्या’ निर्णयाने संतापली राणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.