कोरोना असल्याचे सांगत पती घरातून फरार; गर्लफ्रेंडसोबत झाला ‘सैराट’

मुंबई : देशासह राज्यात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु आहे. याचबरोबर सतत होणाऱ्या रुग्ण संख्येमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण झाले आहे. तसेच अलीकडच्या काळात कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत देखील मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे.

अशाच काळात एक अजब घटना घडली आहे. चक्क कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे कुटुंबियांना सांगत पतीने घरातून पळ काढला. यानंतर पतीसोबत संपर्क होऊ न झाल्याने पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याचबरोबर पती बेपत्ता असल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात केली.

मात्र पोलीस तपासात वेगळेच सत्य समोर आले. कोविड सेंटरमध्ये भरती होण्याचे आणि कुटुंबियांना कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून वाचवण्याचे कारण सांगून गेलेला पती पोलिसांना चक्क गर्लफ्रेंडसोबत सापडला.

ही घटना नवी मुंबई येथे घडली आहे. सध्या सर्वत्र या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर संजीव धुमल सांगतात की, पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांची टीम या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गेली.

दरम्यान, तपास करत असताना मोबाइल इंदूरमध्ये सुरू असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांची टीम इंदूरला पोहोचली आणि त्या व्यक्तीला बेड्या घातल्या. तो इंदूरमध्ये आपले नाव बदलून गर्लफ्रेंडसोबत एका भाड्याच्या घरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

काय सांगता! यूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, बहीण-भावाला अटक

‘खबरदार माझी तुलना रिया चक्रवर्ती सोबत केली तर…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.