मुंबईमधून एक धक्कादायक घटनासमोर झाली आहे. पोदार शाळेची विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक बस गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा सुटल्यानंतर ही बस(Bus) विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडायला निघाली होती. पण चार तास उलटून गेल्यानंतर देखील मुले घरी पोहचली नसल्यामुळे पालक चिंतेत पडले होते.(mumbai horrible news podar school bus missing)
पालकांनी या प्रकरणात शाळेत चौकशी देखील केली होती. यावर शाळेने बसच्या ड्रायव्हरचा मोबाइल स्विच ऑफ येत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे पालक घाबरले होते. यादरम्यान पोदार शाळेची बस सापडली असून सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. पण तब्बल चार तास विद्यार्थी उशिरा घरी पोहचल्यामुळे शाळा प्रशासनाच्या कारभारावर पालकांकडून टीका केली जात आहे.
आज सांताक्रूझमधील पोदार शाळा सुटल्यानंतर १२ वाजता विद्यार्थी घरी जाण्यासाठी शाळेच्या बसमधून निघाले. पण बस विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचलीच नाही. त्यामुळे पालकांनी शाळेत धाव घेत यासंदर्भात चौकशी केली. शाळा प्रशासनाने त्यावर बसच्या ड्रायव्हरचा मोबाइल स्विच ऑफ असल्याची माहिती दिली.
यावर पालकांनी गोंधळ घालत शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. घाबरलेल्या पालकांनी यानंतर पोलिसांकडे शाळेविरोधात तक्रार दाखल केली होती. यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पोदार शाळेत जाऊन चौकशी देखील केली. पण चार तासाने मुले आपापल्या घरी पोहचली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बस चालकाला रस्ते माहित नसल्यामुळे हा प्रकार घडला आहे. बसमध्ये १५ पेक्षा जास्त विद्यार्थी होते. ते सुखरूप आपल्या घरी पोहचले आहेत. या प्रकरणात शाळा बस कंत्राटदारांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे. काही तांत्रिक कारणामुळे ही बस रखडली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, “सांताक्रूझ येथी पोदार शाळेची बस बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात मी पोलीस आयुक्त, डीसीपी या पोलीस यंत्रणेशी बोललो आहे. तसेच शाळा प्रशासनाशी देखील माझे या प्रकरणात बोलणे झाले आहे. विद्यार्थी सुखरूप आपापल्या घरी पोहचले आहेत. या प्रकरणात शाळेला योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”
महत्वाच्या बातम्या :-
मुंबईत खळबळ! तब्बल चार तास पोदार शाळेची बस विद्यार्थ्यांसह झाली बेपत्ता, मग पुढे.., वाचून हादराल
भाजप-मनसे युती पक्की? देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण
टाटांचा मास्टरप्लॅन! आता सगळ्या वस्तू मिळणार एकाच ठिकाणी; रिलायन्स, प्लिपकार्ट-ऍमेझॉनला बसणार धक्का