७५ लाखांची बाईक घेऊन पठ्ठ्या आला भाजी खरेदीला, पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी; पहा व्हिडीओ

मुंबई | शौक बडी चीज है! असेच काहीसे म्हणावे लागते जेव्हा लोकांचे महागडे शौक आपल्या समोर येतात. अशाच एका व्हिडीओची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. एका व्यक्तीने आपल्या मेहनतीने ड्रीम बाईक खरेदी केली आहे. आता तो ही बाईक घेऊन घराबाहेर पडल्यानंतर त्याच्या बाईकची जोरदार चर्चा होत आहे.

होंडा गोल्डविंग Trike असे या दुर्मिळ बाईकचे नाव आहे. विशेष म्हणजे ही बाईक भारतीय रस्त्यांवर पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. यामुळे या गाडीला डोळेभरुन पाहिल्याशिवाय लोकांना राहावत नाही.

मुंबईत या बाईकचा मालक असलेले बाबू जॉन हे भाजी खरेदीसाठी आले होते. तेव्हा त्यांनी आपली बाईक रस्त्यालगत पार्क केली होती. तोपर्यंत ही बाईक पाहण्यासाठी बघ्यांची तुफान गर्दी जमली होती. यावेळीचा व्हिडीओ एका अनोळखी व्यक्तीने काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बाबू जॉन यांनी ही बाईक ७५ लाख रुपये देऊन UAE मधून आयत केली आहे. परंतु यानंतर त्यांना ही बाईक मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. UAE मधून भारतात पोहचल्यांतर लगेच ही बाईक कस्टम विभागाने जप्त केली. यानंतर मात्र ही बाईक सोडवण्यासाठी त्यांना खूप धावपळ करावी लागली आहे.

बाईक जप्त केल्यानंतर जॉन यांना तब्बल २४ लाख रुपयांची कस्टम ड्यूटी भरावी लागली. तसेच अतिरिक्त ३८ लाख रुपये भरावे लागले यानंतर त्यांना ही बाईक मिळाली आहे. यासर्व प्रक्रियेला एका वर्षाचा कालावधी लागला. त्यासाठी बाबू यांनी कोर्टाचा दरवाजाही ठोठावला होता.

होंडा गोल्डविंग Trike ही बाईक १८३२ सीसी आहे. तर सहा सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ११६ बीएचपी पॉवर देते. या बाईकची इंधन क्षमता ५५ लीटर इतकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
अवघ्या सहा लाखांत टाटाची ‘ही’ शानदार SUV कार, वाचा काय आहेत फीचर्स
डोळ्याला मास्क लावून झोपलेल्या प्रवाशाचा फोटो शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले…
संजय राठोडांवर कारवाई व्हायला हवी का? राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला म्हणाल्या…
व्हिडीओ: भयाण आग लागलेल्या इमारतीतून आईने मुलांना ‘असं’ वाचवलं, पहा श्वास रोखणारा थरार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.