कंगणाच्या अडचणीत वाढ; या कारणामुळे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई | सध्या कंगना राणावत आणि दिलजीत दोसांझ यांच्यात खूप वाद सुरू आहे. ट्विटरवर सध्या हाच विषय ट्रेंडिंगला आहे. कंगणाच्या विरोधात आता पूर्ण बॉलीवूड एकवटले आहे. दरम्यान कंगणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

यामध्ये कंगणाचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्याची मागणी केली आहे. कंगना तिच्या ट्विटर अकाऊंटवरून सतत तिरस्कार, वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न करत आहे असे त्या याचिकेत लिहिले आहे.

यावर कंगणा म्हणाली आहे की, मी अखंड भारताबद्दल बोलत आहे. रोज मी तुकडे तुकडे टोळीशी लढत आहे. तरीही माझ्यावर देशाचे विभाजन केल्याचा आरोप केला जात आहे. माझ्यासाठी ट्विटर हे एकमेव प्लॅटफॉर्म नाही.

एका इशाऱ्यात हजारो कॅमेरे माझ्याकडे मुलाखत घेण्यासाठी येतील. माझा आवाज दाबण्यासाठी तुम्हाला मला मरावं लागेल. त्यानंतर मी प्रत्येक भारतीयांच्या माध्यमातून बोलेन हे माझे स्वप्न आहे.

तुम्ही काहीही केलं तरी माझं स्वप्न ध्येय साकार होईल. म्हणून मला खलनायक आवडतात, असं कंगना म्हणाली आहे. यानंतर ट्विटरवर आणखी वाद वाढला आहे. बऱ्याच नेत्यांनी आणि बॉलीवूड अभिनेत्यांनी कंगणाला यावरून झापले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका आजींना बिलकीस बानो म्हणत खिल्ली उडवली होती त्यानंतर हा वाद पेटला आहे. दिलजीतने कंगणाला यावर जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आजींनीही कंगणाला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मिका सिंगनेही कंगनाला यावरून झापले आहे.

महत्वाच्या बातम्या-

आता भाजपनेही कंगनाला फटकारले; ‘या’ प्रकरणी जाहीर माफी मागण्याचा दिला आदेश

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याऐवजी तू जाहिराती कसल्या करतोय; अक्षयकुमारला झापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.