कंगणाच्या ऑफिसवरची कारवाई बेकायदेशीर, तिला भरपाई द्या; हायकोर्टाचा आदेश

मुंबई | मुंबई महापालिका आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत यांचा वाद शिगेला पोहोचला होता. कंगना वारंवार वादग्रस्त विधाने करत होती यामुळे महाराष्ट्र सरकार आणि कंगना यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत होते.

याचदरम्यान, कंगणाचे मुंबईतील ऑफिस अनधिकृत म्हणत मुंबई महापालिकेने ऑफिसवर हातोडा मारला होता. मात्र ही कारवाई अवैध असल्याचे सांगत मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दणका दिला आहे.

कार्यालय तोडल्यानंतर कंगणाने हायकोर्टात या प्रकरणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती याचा निर्णय आज कोर्टाने दिला. कंगणाचा ऑफीसवर मुंबई महापालिकेने केलेली कारवाई ही अवैध आहे असे कोर्टाने सांगितले आहे.

तसेच महापालिकेने कंगणाला दिलेली नोटीस अवैध आहे त्यामुळे महापालिकेला भरपाई द्यावी लागणार आहे. कंगणाच्या विनंतीचा विचार करून नुकसानीचे मूल्यमापन केले जाईल आणि नंतर त्याविषयी निर्णय दिला जाईल.

हा निर्णय शाहरुख काथावाला व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने दिला आज दिला. तसेच मुंबई मनपाची कारवाई नागरिकांच्या हक्कांविरोधात आहे असंही मत न्यायालयाने नोंदविले. त्यामुळे आता मुंबई महापालिकेला कंगणाला भरपाई द्यावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

रजनीकांत आणि माधुरी दीक्षितची जवळीक वाढत होती; म्हणून दिग्दर्शकाने चित्रपटाची स्क्रिप्ट बदलली

कंगना राणावतने केलेल्या टिकेवर पहिल्यांदाच बोलले मुख्यमंत्री, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.