Share

मुस्लिमांच्या भावना दुखावतात म्हणणाऱ्यांना दणका! ‘काश्मीर फाइल्स’वर बंदीची मागणी कोर्टाने फेटाळली

Kashmir-Files.

विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई(Mumbai) उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे हा चित्रपट नियोजित तारखेला म्हणजेच ११ मार्चला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.(mumbai high court rejected the kashmir files fim stay Petition)

७ मार्च रोजी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाली. चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी ही याचिका यूपीचे रहिवासी इंतेझार हुसैन सय्यद यांनी दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.

या याचिकेत चित्रपटाच्या विरोधात जातीय हिंसाचाराचा आरोप करण्यात आला होता. याचिकाकर्त्याने आरोप केला होता की, चित्रपटात घटनेची फक्त एक बाजू दाखवण्यात आली आहे. या याचिकेत चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची तसेच त्याचा ट्रेलर यूट्यूबवरून हटवण्याची मागणी करण्यात आली होती. पण उच्च न्यायालायने ही याचिका फेटाळली आहे.

या चित्रपटात अनुपम खेर, मितुल चक्रवर्ती, दर्शन आणि पल्लवी जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. नुकतेच चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कॉमेडीयन कपिल शर्मावर गंभीर आरोप केले होते. चित्रपटात व्यावसायिक आणि मोठी स्टार कास्ट नाही म्हणून कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला, असा आरोप दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी जम्मूमधील रहिवाशांसाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी चित्रपट संपल्यानांतर अनेक प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले होते. या स्पेशल स्क्रीनिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

यापूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी ‘ताशकंद फाइल्स’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. या चित्रपटाची सोशल मीडियावर फार चर्चा झाली होती. या चित्रपटावरून देखील वाद निर्माण झाला होता. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
वाराणसीमध्ये ईव्हीएम कुठे नेले जात होते? निवडणूक आयोगाने केला खुलासा
४०० करोडचे मालक असलेल्या अनुपम खेर यांनी एकदा मंदिरातून चोरले होते ११८ रुपये, आईने दिली होती कानाखाली
महिलेला मधलं बोट दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण, वाचा संपूर्ण प्रकरण

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now