Share

हायकोर्टाच्या महत्वपूर्ण आदेशानंतर एसटी संपाचा तिढा अखेर सुटला, कर्मचाऱ्यांचा तुफान जल्लोष

st

महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कुठल्याही एस टी कर्मचाऱ्यावर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai High Court) राज्य सरकारला दिले आहेत. तसेच एस टी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युईटी देण्याचे निर्देश देखील न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले आहेत.(mumbai high court give desion on st)

त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांचा तिढा अखेर सुटला आहे. या निकालामुळे एस टी कर्मचारी आनंदात आहेत. या निकालावर एस टी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही भारतीय आहोत पाकिस्तानी नाही’, असे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

एस टी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी ऑक्टोबर महिन्यापासून आंदोलन करत होते. त्यामुळे एसटीची सेवा देखील बंद होती. यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. या आंदोलनदरम्यान राज्य सरकारने काही एस टी कर्मचाऱ्यांना बडतर्फ देखील केले होते.

पण आता न्यायालयाने एस टी कर्मचाऱ्यावर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने सांगितले की, “संप करणारे एस टी कर्मचारी कामावर रुजू झाल्यास त्यांच्यावर कोणत्याही प्रकराची कारवाई करण्यात येऊ नये. तसेच ज्या एस टी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असतील, त्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार नाही.”

राज्य सरकारने एस टीच्या विलीनीकरणाच्या मागणीला विरोध केला होता. एस टी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे शक्य नाही, अशी भूमिका राज्य सरकराने घेतली होती. यासाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीय समितीची स्थापना देखील केली होती. या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल देखील राज्य सरकारने न्यायालयात सादर केला होता.

एस टी महामंडळ सध्या आर्थिक तोट्यात आहे. या तोट्यातून एस टी महामंडळाला बाहेर काढण्यासाठी अर्थी मदतीची गरज आहे, असे त्रिसदस्यीय समितीने अहवालात सांगितले होते. एस टी महामंडळाने आंदोलन करणाऱ्या बडतर्फ कर्मचाऱ्यांचे पगार देखील थकवले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना इतर कामे करावी लागत आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदावरून वसंत मोरेंची उचलबांगडी, साईनाथ बाबर नवे शहराध्यक्ष; राज ठाकरेंची तडकाफडकी कारवाई
विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैशाचं काय झालं? पत्रकारांनी प्रश्न विचारताच सोमय्यांनी काढला पळ
वसंत मोरे मनसेला रामराम ठोकणार? राज ठाकरेंवर नाराज होत मोठी पावले उचलल्याने चर्चांना उधाण

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now