राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट पोस्ट केल्याच्या प्रकरणात एका २१ वर्षीय विद्यार्थ्याला अटक करण्यात आली होती. `या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाकडून त्या विद्यार्थ्याला जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर या निर्णयाला आव्हान देणारी आणखी एक याचिका त्या विद्यार्थ्याकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 9mumbai high court angry on police)
सध्या मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी सुरु आहे. यावेळी सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने9Mumbai High Court) महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. “त्या ट्विटमध्ये कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. एका महिन्यापेक्षा जास्त काळ एका विद्यार्थ्याला तुरुंगात ठेवले जाते. हे योग्य नाही. असे करून तुम्ही दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचे नाव खराब करीत आहात”, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना सुनावले आहे.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना गृह विभागाकडून निर्देश देण्यात यावेत आणि त्या विद्यार्थ्याची तुरुंगातून सुटका करण्यास हरकत नाही असे निवेदन देण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती एम.एन.जाधव यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात एक आक्षेपार्ह ट्विट पोस्ट करण्यात आले होते. “वेळ आली आहे, बारामतीच्या गांधीसाठी…बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची…”, असे ट्विट निखिल भामरे या तरुणाने केले होते. त्यानंतर या प्रकरणात निखिल भामरे या २२ वर्षीय तरुणाविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या प्रकरणात अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यानंतर १४ मे रोजी निखिल भामरे या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाकडून निखिल भामरेला जामीन नाकारण्यात आला होता. यानंतर निखिल भामरे यांनी या निर्णयाला आव्हान देणारी आणखी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
या प्रकरणात सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले की, “दररोज शेकडो आणि हजारो ट्विट पोस्ट केले जातात. तुम्ही प्रत्येक ट्विटची दखल घ्याल का?”, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ जून रोजी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
सुशांतच्या पुण्यतिथीला भावूक झाली बहिण, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली, भावा, तु जगाला…
..त्यामुळे लग्न झाल्यापासून मी एकदाही वडाला फेऱ्या मारल्या नाहीत, रुपाली चाकणकरांचे मोठे वक्तव्य
५४ व्या वाढदिवसानिमित्त चाहत्याने छातीवर काढलं राज ठाकरेंच्या छबीचं टॅटू, राज्यभरात होतेय चर्चा