Share

लग्नानंतर पत्नी लगेचच झाली गरोदर, डॉक्टरकडे नेल्यानंतर झाला धक्कादायक खुलासा, पतीही हादरला

Marriage

मुंबईतुन(Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील एका २२ वर्षीय मुलीचे आई-वडिलांनी एका तरुणाशी नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्न(Marriage) लावून दिले होते. पण लग्नाच्या काही दिवसांनंतर ही मुलगी गरोदर झाली. पण वैद्यकीय तपासणीत ही मुलगी लग्नापूर्वीच गरोदर असल्याचं उघडं झालं. यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.(mumbai father raped his daughter)

त्यानंतर पीडित मुलीने जे सांगितलं ते ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर तिच्याच वडिलांनी वारंवार बलात्कार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच पीडित मुलीच्या वडिलांना अटक केली आहे.

पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या दोन आठवड्यांपूर्वी सुद्धा वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला होता. लग्नानंतर पीडित मुलीच्या पोटात दुखू लागले. त्यानंतर पीडित मुलीच्या पतीने तिला रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत पीडित मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं.

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे की, “२०१९ पासून वडील तिच्यावर बलात्कार करत होते. आई नातेवाइकांकडे कार्यक्रमाला गेली होती तेव्हा माझ्या वडिलांनी मला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली”, असे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा एक रिक्षाचालक आहे. आरोपी गेल्या तीन वर्षांपासून पीडित मुलीवर बलात्कार करत होता. पीडित मुलीने हा सर्व प्रकार तिच्या आईला आणि बहिणीला सांगितला. पण आईने आणि बहिणीने पीडित मुलीला गप्प राहण्यास सांगितले. डिसेंबरमध्ये अचानक पीडित मुलीच्या पोटात दुखू लागले.

त्यानंतर आईने आणि काकूने पीडित मुलीला डॉक्टरांकडे नेलं. त्यावेळी पीडित मुलगी गरोदर असल्याचे तिच्या आईला समजले. पण आईने पीडित मुलीला याबाबत माहिती दिली नाही. उलट आई पीडित तरुणीला गर्भपाताच्या गोळ्या देत होती. पण पीडित मुलीचा गर्भपात झाला नाही. त्यानंतर पीडित मुलीचे लग्न झाआल्यावर हा सगळं प्रकार उघडकीस आला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
राज्यपालांनी असं निघून जाणे, भाषणावेळी त्यांचा अपमान होणे हे अयोग्य, आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली खंत
पुण्यातील विवाहित महिला २० वर्षाच्या मुलासाठी पतीला सोडून गेली पळून; ऑनलाईन सुरु झाली होती लव्हस्टोरी
पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी घेतला भारताच्या तिरंग्याचा आधार, पडले युक्रेनमधून बाहेर; वाचा नक्की काय घडलं

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now