मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईतील(Mumbai)नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईमधील अनेक भागांमध्ये पावसामुळे पाणी साचले आहे. यामुळे वाहतुक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.(mumbai delivery boy horse riding video viral)
या व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बॉय घोड्यावरून डिलिव्हरी देण्यासाठी जाताना दिसत आहे. या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला हा व्हिडिओ मुंबईतील एका डिलिव्हरी बॉयचा असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले आहे. यावर एका डिलिव्हरी बॉयने भन्नाट युक्ती वापरली आहे. या डिलिव्हरी बॉयने जेवणाची डिलिव्हरी देण्यासाठी घोड्याचा वापर केला आहे. हा डिलिव्हरी बॉय चक्क घोड्यावरून डिलिव्हरी देण्यासाठी निघाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
https://twitter.com/Yuvakiawaaz2022/status/1544765780885008385?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1544765780885008385%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fbusiness%2Fbusiness-news%2Fdue-to-heavy-rainfall-in-mumbai-swiggy-delivery-executive-uses-horse-instead-of-bike-now-company-searching-for-him-to-reward%2Farticleshow%2F92717459.cms
या डिलिव्हरी बॉयने पाठीवर बॅग देखील अडकवली आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ केवळ १० सेकंदांचा आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “खूप हुशार डिलिव्हरी बॉय.” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, “या डिलिव्हरी बॉयला सलाम.”
अनेकांनी या व्हिडिओला लाइक देखील केले आहे. सोशल मीडियावर या डिलिव्हरी बॉयचे कौतुक केले जात आहे. अनेकांनी डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडिओमधील डिलिव्हरी बॉय हा स्विगीचा एजंट असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्विगी ‘या’ डिलीव्हरी बॉयला बक्षीस देण्यासाठी शोधत असल्याचे देखील सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘विश्रांती घेतल्याने कोणीही फॉर्ममध्ये येत नाही’, दिग्गज क्रिकेटर विराट-रोहितवर संतापला
उद्धव ठाकरेंविरोधात आता ठाण्यातील रिक्षावाले एकवटले, एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ झळकावले बॅनर
शिवसेनेला भलं मोठं भगदाड! अनेक पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे; शिंदे गटाला दिला जाहीर पाठिंबा






