मुंबई कशी बदलली? तेव्हाच्या आणि आताच्या मुंबईत काय फरक आहे? पहा शरद पवार काय म्हणतात..

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली यानंतर आज ते पहिल्यांदाच घराबाहेर पडले. बरेच दिवस तर घरातच होते. यामुळे त्यांना थोडं बर वाटावे म्हणून खासदार सुप्रिया सुळे त्यांना घेऊन घराबाहेर पडल्या. मुंबईत त्यांनी गाडीतून फेरफटका मारला.

यावेळी गाडीतच सुप्रिया सुळे यांनी त्यांना मुंबईबद्दल अनेक प्रश्न विचारले, आपण मुंबई कधी राहायला आलो, जेव्हा आलो तेव्हाची मुंबई आणि आताची मुंबई यात काय बदल झलाय, अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारले आणि त्यांनी फेसबुक लाईव्ह केले.

यावेळी शरद पवार म्हणाले, साधारणत १९६२-६३ मध्ये काँग्रेसचे युवक सेक्रेटरी म्हणून मी मुंबईला आलो, त्यावेळी दादरला खेड गल्ली होती. तिथे सगळे मिल वर्कर होते. पुणे जिल्ह्यातील लोक जास्त होते. आता त्याचे नाव काकासाहेब गाडगीळ लेन असे आहे.

आता तिथे काँग्रेसचे टिळक भवन आहे. तिथे आम्ही राहायचो. आम्ही तिथे ५ वर्ष टिळक भवनमध्ये राहिलो. आता बदललंय सगळं. तो सामान्य लोकांचा भाग होता. तेथे कोकणातील होते, घाटावरचे होते, कोकणी लोक मोठ्या संख्येने होते.

तेव्हा घाटावरचे लोक म्हणायचे, आपण सगळे घाटी होतो. आपल्याला घाटी म्हणायचे. गावाकडून कोणी कार्यकर्ता, पाहुणा आला की भागातील लोक सगळे जाऊन त्याला चांगले जेवण देणार, त्याला सिनेमा दाखवणार, तो माणूस गावाकडे जाऊन सांगायचा, काय माझी बडदास्त ठेवलेय, सिनेमा दाखवला, जेवण दिलं वगैरे.

ते लोक खुश होऊन जायचे. गावाकडे सांगायचे आपले लोक कसे चांगले वागतात वगैरे. ती वेगळी मुंबई होती, आताची वेगळी आहे. ते कल्चर वेगळं होते, मुख्य म्हणजे इथला सामान्य माणूस गेला. मराठी माणूस, आता बहुमजली इमारती आल्या. समाजकारण बदललंय, असे पवार म्हणाले.

मोठा राजकीय अनुभव असलेले शरद पवार अनेकदा आपला जीवन प्रवास उलगडून सांगतात. संपूर्ण राज्यासह देशाची अगदी सगळी माहिती त्यांना आहे. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी माहिती त्यांना आहे.

ताज्या बातम्या

१२०० रूपयांत सुरू केलेला व्यवसाय पोहोचला ५० हजार कोटींमध्ये, वाचा किरण मजूमदार यांची यशोगाथा

रेमडीसीवीरसाठी खूप लोकांनी मागणी केली पण कोरोनील हवे ही मागणी कुणीच केली नाही

…म्हणून जुही चावलाने आमिर खानला किस करायला दिला होता सरळ सरळ नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.