Share

Mumbai Bomb Blast Case 2006 : उज्वल निकम यांची संतप्त प्रतिक्रिया, मुंबई बॉम्बस्फोटाच्या निकालावर खदखद व्यक्त, म्हणाले….

Mumbai Bomb Blast Case 2006 : मुंबई (Mumbai) शहरात 2006 साली लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. तब्बल 18 वर्षांनंतर या प्रकरणातील 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “एक सामान्य नागरिक म्हणून मला प्रचंड दुःख झालं आहे.” त्यांनी याच निर्णयाविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अपील करण्याची गरज असल्याचं मत मांडलं आहे.

उज्वल निकम यांनी म्हटलं की, “1993 मध्ये जसं मुंबईत साखळी बाँबस्फोट घडवले गेले होते, तसंच मॉडेल 2006 मध्ये आरडीएक्स वापरून पुन्हा वापरलं गेलं. यात 200 पेक्षा अधिक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. ही घटना अत्यंत भीषण होती.”

ते पुढे म्हणाले, “मी स्वतः हा खटला चालवलेला नाही, तरीही एक नागरिक म्हणून या निकालामुळे माझ्या मनात खूप अस्वस्थता आहे. सत्र न्यायालयानं दोषी ठरवलेल्या आरोपींना उच्च न्यायालयानं निर्दोष ठरवलं, याचा अर्थ न्यायालयाला सादर केलेले पुरावे अपुरे वाटले असावेत.”

सरकारने सुप्रीम कोर्टात अपील करावं

निकम यांनी स्पष्टपणे सुचवलं की, सरकारने या निकालाचे बारकाईने मूल्यमापन करून सर्वोच्च न्यायालयात अपील करावं. “जर कोर्टानं यावर स्टे दिला असता, तर वेगळी परिस्थिती असती. पण आता लवकरात लवकर पुढील पाऊल उचलणं आवश्यक आहे,” असं ते म्हणाले.

2006 च्या मुंबई बाँबस्फोटातील प्रमुख घडामोडी :

  1. जुलै 2006 मध्ये 11 मिनिटांत 7 लोकल ट्रेनमध्ये बाँबस्फोट

  2. स्फोटांमध्ये 209 नागरिकांचा मृत्यू, 800 हून अधिक जखमी

  3. प्रेशर कुकरमध्ये बाँब ठेवून लोकलमध्ये स्फोट घडवले

  4. खार रोड, बांद्रा, जोगेश्वरी, माहिम, मीरा रोड, बोरिवली येथे स्फोट

  5. इंडियन मुजाहिद्दीन (Indian Mujahideen) दहशतवाद्यांचा सहभाग

  6. 2015 मध्ये मकोका कोर्टाकडून १२ आरोपी दोषी ठरले

  7. त्यातील ५ जणांना फाशी, ७ जणांना जन्मठेप

  8. 21 जुलै 2025 रोजी उच्च न्यायालयाकडून 11 आरोपी निर्दोष ठरवले

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now