मुंबई महापालिका आर्थिक दिवाळखोरीत? पालिकेवर दैनंदिन खर्चासाठी कर्ज काढण्याची वेळ

मुंबई | मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आहे. इतकेच नव्हे तर ती आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. आता ही मुंबई महापालिका अर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचे संकेत मिळत आहेत. दैनंदिन खर्चासाठी कर्ज रोखे काढण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. धनाढ्यांवर सवलतींचा वर्षाव आणि सामान्य मुंबईकरांच्या गळ्यात करांचा धोंडा मारल्याचा आरोप भाजपने केला आहे.

अंदाजित उत्पन्नाच्या केवळ २५ टक्के उत्पन्न आतापर्यंत प्राप्त झाले आहे. कोविडसाठी २१०० कोटींच्या खर्चाचा अधिक बोजा यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी तूट येण्याची शक्यता आहे. तसेच २०२०-२१ मध्ये महापालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पाची सद्यपरिस्थिती गंभीर बनलेली आहे.

अंदाजित उत्पन्नाच्या प्राप्तीची आकडेवारी पुढील प्रमाणे (१ एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२०)

मालमत्ता कर अंदाजित प्राप्ती रु ६७६८.५८ कोटी तर प्राप्ती ७३४.३४ कोटी रुपये
विकास नियोजन खात्याची अंदाजित प्राप्ती ३८७९.५१ कोटी पैकी प्राप्ती ७०२.२० कोटी.
महापालिका एकूण २७ हजार ४४८ अपेक्षित महसुलाच्या तुलनेत ११ हजार ६१६ कोटी रुपये कमवू शकली आहे.

दरम्यान, चालू अर्थसंकल्पीय वर्ष पूर्ण होण्यासाठी केवळ दोन महिने राहिले आहेत. अशात एवढ्या कमी कालावधीत महापालिकेने टोकाचे प्रयत्न केले तरी उत्पन्न ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढेल असे आजच्या या आकडेवारीवरुन दिसत नाही. यामुळे अर्थसंकल्पात मोठी तूट निर्माण होणार आहे.

महापालिकेने आपल्या उत्पन्नाबाबत दिलेल्या निवेदनावर भाजपने टीका केली आहे. मालमत्ता कराची संपूर्ण वसुली सुनिश्चित करण्यासाठी नागरी मंडळाची कोणतीही योजना नाही. तर परवाना शुल्कावरील दरात कपात केल्यानं त्यांच उत्पन्न आणखी घसरले आहे. तसेच अजूनही सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. ते कराच्या बोजाखाली आहेत.

महत्वाच्या बातम्या-
खुशखबर! वाहनाच्या नव्या पॉलिसीमुळे वाहननिर्मितीला मिळणार चालना
‘गरिबाला आणखी गरीब करु नका, महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्या’
महिलावर्गासाठी खुशखबर! अर्थमंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा; घेतला ‘हा’ निर्णय
‘मक्कडी’ चित्रपटातील अभिनेत्रीने केले स्वीकार; म्हणाली, मी पैशांसाठी देहविक्री करत होते पण नंतर मात्र….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.