Share

Mumbai BEST Election Result: ठाकरे बंधूंना धक्का; मध्यरात्री पुन्हा मोजणी का झाली? BEST निवडणुकीत नेमकं काय घडलं?

Mumbai BEST Election Result : मुंबईतील (Mumbai city) राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (BEST Employees Co-operative Credit Society) निवडणुकीच्या मतमोजणीत मध्यरात्री अनपेक्षित वळण आल्याने वातावरण चांगलेच तापले. १८ ऑगस्टला मतदान झाल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री निकाल जाहीर झाला. प्रारंभी महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलला (Sahakar Samruddhi Panel) ९ जागांवर आघाडी मिळत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अचानक मध्यरात्री पुन्हा मतमोजणी सुरू करण्यात आली आणि त्यानंतर शशांक राव (Shashank Rao) यांच्या पॅनलने आणखी दोन जागांवर विजय मिळवत एकूण १४ जागांवर दणदणीत यश मिळवलं.

गेल्या ९ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर एकहाती वर्चस्व असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group) या वेळी एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या युतीवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. अनेकांच्या मते ही निवडणूक या युतीसाठी एक लिटमस टेस्ट होती.

मात्र, शशांक राव (Shashank Rao) यांचा दीर्घकाळातील कामगार संघटनांमधील अनुभव, आंदोलनांमधील सक्रिय सहभाग व बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरील सततचा फोकस, यामुळे सुमारे १५ हजार मतदारांनी अनुभवी नेतृत्वाला पसंती दिली. या निवडणुकीत सहकार समृद्धी पॅनेलच्या ७ उमेदवारांनी विजय मिळवला असून त्यामध्ये भाजप (BJP) गटातील ४, शिंदे गटातील (Shinde Group) २ आणि ओबीसी वेल्फेअर युनियनचा (OBC Welfare Union) १ उमेदवार विजयी झालाय.

शशांक राव पॅनल – १४ विजयी उमेदवार

  1. आंबेकर मिलिंद शामराव

  2. आंब्रे संजय तुकाराम

  3. जाधव प्रकाश प्रताप

  4. जाधव शिवाजी विठ्ठलराव

  5. अम्मुंडकर शशिकांत शांताराम

  6. खरमाटे शिवाजी विश्वनाथ

  7. भिसे उज्वल मधुकर

  8. धेंडे मधुसूदन विठ्ठल

  9. कोरे नितीन गजानन

  10. किरात संदीप अशोक

  11. डोंगरे भाग्यश्री रतन (महिला राखीव)

  12. धोंगडे प्रभाकर खंडू (अनुसूचित जाती/जमाती)

  13. चांगण किरण रावसाहेब (भटक्या विमुक्त जाती)

  14. शिंदे दत्तात्रय बाबुराव (इतर मागासवर्गीय)

सहकार समृद्धी पॅनल – ७ विजयी उमेदवार

  1. रामचंद्र बागवे

  2. संतोष बेंद्रे

  3. संतोष चतुर

  4. राजेंद्र गोरे

  5. विजयकुमार कानडे

  6. रोहित केणी (महिला राखीव मतदारसंघ)

  7. रोहिणी बाईत

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now