मुंबई इंडियन्सने जिंकले सगळ्यांचे मन, विदेशी खेळाडूंना घरी पाठवण्यासाठी केली ‘ही’ सोय

आयपीएल स्पर्धेचा चौदावा हंगाम अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आला आहे. स्पर्धा स्थगित झाल्यानंतर आता परदेशी खेळाडूंना त्यांच्या घरी जाण्याचे वेध लागले आहेत. दक्षिण आफ्रिका संघाला त्यांच्या देशाकडून येण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

पण इथे खरी अडचण ऑस्ट्रेलियन खेळाडूंची झाली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमान सेवांवर बंदी घातली आहे. मुंबई इंडियन्स संघाने तर त्यांच्या खेळाडूंना मायदेशी पाठविण्यासाठी प्रायव्हेट चार्टर्ड फ्लाईट्सची सेवा देऊ केली आहे.

मुंबई इंडियन्स संघ एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी बाकीच्या फ्रेंचायझिंना पण मदतीसाठी हात पुढे केला आहे. मुंबई इंडियन्स असा एक संघ आहे ज्याने परदेशी खेळाडूंना त्यांच्या खेळाडूंना चार्टर्ड फ्लाईटसने जाण्याची सोय केली आहे.

मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू चार्टर्ड फ्लाईट्स न्यूझीलंड, वेस्ट इंडिज व्हाया दक्षिण आफ्रिका या मार्गे जातील. येत्या २४ ते ४८ तासांमध्ये त्या त्या देशांसाठी रवाना होतील.

सनरायझर्स हैद्राबाद संघ टेन्शनमध्ये असून त्यांना अजून त्यांचे फ्लाईट शेड्युल ठरवता आलेले नाही. आम्ही आमच्या परीने सर्वोतोपरी प्रयत्न करत असून अजून तरी ठोस कार्यक्रम ठरला नसल्याचे हैद्राबाद संघाच्या मॅनेजरने म्हटले आहे.

बीसीसीआय परदेशी खेळाडूंना त्यांच्या देशात जाता यावे म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डांशी बोलत आहे. ऑस्ट्रेलियात भारतातून जाणाऱ्या विमानांवर बंदी असल्यामुळे त्यांच्या खेळाडूंना श्रीलंका किंवा मालदीव मध्ये पाठविण्यात येईल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.