Share

Mukesh Khanna : ‘लाल सिंग चड्ढा फ्लॉ’प झाल्यानंतर शक्तीमानने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, आज हिंदू अचानक…

mukesh-khanna

Mukesh Khanna : आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट सध्या अनेक वादात सापडला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला होता. आता सोशल मीडियावर या चित्रपटावर सातत्याने बहिष्कार टाकला जात आहे. आमिरच्या या चित्रपटावर लोक प्रदर्शित झाल्यापासून बहिष्कार घालत आहेत.(Lal Singh Chadha flop, Mukesh Khanna reaction, Boycott, Aamir Khan)

याचा संपूर्ण परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर स्पष्टपणे दिसून येतो. यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया सातत्याने येत आहेत. अशा परिस्थितीत आता या चित्रपटाबाबत ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांचे वक्तव्य समोर आले आहे. मीडियाशी बोलताना मुकेश खन्ना यांनी आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाबाबत आपलं मत मांडलं आहे.

मुकेश खन्ना यांना आमिरच्या चित्रपटाबद्दल विचारले असता, मागील सर्व चित्रपटांवर नजर टाकली असता, आमिरच्या या चित्रपटाचा परफॉर्मन्स खूपच खराब झाला आहे. हे कसले तर्क आहे? चित्रपटाचा आशय वाईट आहे की दीर्घकाळापासून समोर आलेल्या त्यांच्या विधानांचा परिणाम चित्रपटावर होताना दिसतोय?

यावर मुकेश खन्ना म्हणाले, ‘ही थोडी गंभीर बाब आहे, जी यापूर्वी कधीही घडली नाही. याआधीही ‘पद्मावत’, ‘लक्ष्मी’, ‘तांडव’ या चित्रपटांबाबत आंदोलने झाली आहेत. पण, जुन्या गोष्टी मांडून विरोध केला जात असल्याची ही पहिलीच घटना आहे.

मुकेश खन्ना पुढे म्हणाले की, बहिष्काराचा ट्रेंड हा गंभीर मुद्दा बनला आहे. यात असे अनेक लोक सामील आहेत ज्यांनी अद्याप चित्रपट पाहिला नाही आणि ते याला विरोध करत आहेत. या गोष्टीमुळे बॉलिवूडचे खूप नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत निर्माते, दिग्दर्शकांनी हा विषय सौम्यपणे घेऊ नये. याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. आज जणू हिंदू जनता अचानक जागे झाली आहे.

महत्वाच्या बातम्या
Lal Singh Chadha: सुट्टी संपताच लाल सिंग चड्ढा तोंडावर आपटला, शो रद्द झाल्याने कमावले फक्त एवढे कोटी
Lal Singh Chaddha Review: रिलीज व्हायच्या आधीच समोर आला लाल सिंग चड्ढाचा रिव्ह्यू, वाचा आणि मगच जा पाहायला
Aamir Khan: लालसिंग चड्ढाने वीकेंडला पकडला वेग, तरीही ५० कोटींपासून फारच लांब, वाचा आतापर्यंतची कमाई

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now