Share

Mukesh Khanna : ‘करवा चौथ’ची खिल्ली उडवणाऱ्या रत्ना पाठक यांना मुकेश खन्नांनी झाप झाप झापलं, म्हणाले…

Ratna Pathak Mukesh Khanna

Mukesh Khanna : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रत्ना पाठक यांनी एका मुलाखतीदरम्यान एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. करवाचौथ या सणावर आपले मतप्रदर्शन करून त्यांनी महिलांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी रत्ना पाठक यांनी केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे.

रत्ना पाठक शहा यांना एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं होतं की, पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्या करवा चौथचा उपवास करतात का? यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मी वेडी आहे का? असा उपवास कोण करणार? नवर्‍याच्या दीर्घायुष्यासाठी सुशिक्षित स्त्रियाही उपवास करतात हे आश्चर्यकारक आहे. विधवा होणं ही भारतातील भयंकर परिस्थिती आहे, या भीतीपोटी महिला करवा चौथचा उपवास करतात. एकविसाव्या शतकातही आपण असं बोलतो याचं आश्चर्य वाटतं.”

मुकेश खन्ना यांनी रत्ना पाठक शाह यांच्या या वक्तव्यावर सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही शिकलेले आहात? सुशिक्षित बायका सोडा, गावातल्या बायका सोडा, अशिक्षित बायका सोडा, मोठ्या घरातील बायकासुद्धा करवा चौथचा उपवास करण्यात अभिमान बाळगतात.

या सुंदर उत्सवाला तुम्ही अंधश्रद्धा म्हणता. चला अंधश्रद्धा का असेना पण जर पत्नी आपल्या पतीच्या सुखासाठी, पतीच्या आयुष्यासाठी अंधश्रद्धेत राहूनही एक दिवसाचा उपवास ठेवत असेल आणि चंद्र पाहून आपलं व्रत पूर्ण करत असेल तर यापेक्षा सुंदर काय असू शकतं?”

पुढे मुकेश खन्ना म्हणाले की, “हे सुशिक्षित लोक स्वतःला इतके सुशिक्षित समजतात की ते देशाविरोधी आणि धर्माविरोधी काहीही बोलतात. जो धर्म तुम्ही विवाहाच्या वेळी अंगीकारला आहे, तो धर्म आता तुमच्यावर अधिकार गाजवतोय असं मी मानू का? असं असेल तर तुम्ही तुमच्या नावापुढे पाठक का लिहिता? ते आडनाव काढून टाका,” अशा शब्दांत त्यांनी रत्ना पाठक शाह यांच्यावर निशाणा साधला.

एवढेच नव्हे तर मुकेश खन्ना यांनी रत्ना यांना मूर्खसुद्धा म्हटले आहे. “तुम्ही मूर्ख आहात. शिक्षण तुम्हाला हे सर्व शिकवतं का? तुम्ही कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं आहे? तुमचं हे वक्तव्य कोणालाच आवडलं नाही, असेही मुकेश खन्ना रत्ना पाठक यांना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
BJP : भाजपच्या माजी खासदाराचे कर्करोगामुळे निधन, दोन दिवसांपुर्वीच फडणवीसांनी घेतली होती भेट
Rakshabandhan : रक्षाबंधनच्या आधीच गमावले दोन सख्खे भाऊ, मामानेच केला भाच्यांचा घात, वाचून हादराल
Eknath Shinde : शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, मंत्रिपद न मिळाल्याने ‘हे’ पाच आमदार नाराज
Priya Bapat: अब पैसा कौन देगा रे? प्रिया बापटला का पडली पैशांची गरज? वाचा नेमकं काय घडलं

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now