प्रत्येक कुटुंबात गृहकलह मोठ्या प्रमाणात आढळतो. कुटुंब वाढत जाते तसे त्यामध्ये होणारे मतभेद देखील वाढत जातात. देशातील उद्योग जगतात प्रतिष्ठित असलेल्या अंबानी(Ambani) कुटुंबात देखील अशाच प्रकारचा वाद निर्माण झाला होता. उद्योगपती अनिल अंबानी(Anil Ambani) आणि मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्यात संपत्तीच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता.(mukesh and anil ambani fight)
या वादाची संपूर्ण देशात चर्चा झाली होती. २००५ मध्ये देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे असलेल्या अंबानी कुटुंबात फूट पडली होती. अंबानी कुटुंबात फूट पडलेल्या घटनेला १५ वर्षे झाली आहेत. या वर्षांमध्ये मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही देशातील सर्वाधिक मोठी कंपनी बनली आहे, तर अनिल अंबानी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत.
अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी या दोन भावांमध्ये नेमका वाद का झाला? याबाबत सामान्य लोकांना पुरेशी माहिती नाही. पण आता या वादामागील कारण समोर आले आहे. २००२ मध्ये रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. उद्योगपती धीरूभाईंनी आपल्या वारशाबाबत कोणतीही योजना आखली नव्हती.
धीरूभाई हयात असताना दोन्ही भावांमध्ये कोणताही वाद नव्हता. पण धीरूभाईंच्या मृत्यूनंतर दोघा भावांमध्ये मतभेद निर्माण झाले. धीरूभाईंनंतर दोन्ही भावांनीच परस्पर संमतीने पदांची विभागणी केली होती. मुकेश अंबानी रिलायन्स ग्रुपचे चेअरमन झाल्यावर अनिल व्हाईस चेअरमन म्हणून काम करू लागले.
दोघांमधील हा ताळमेळ फार काळ टिकू शकला नाही आणि तणाव निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या परवानगीशिवाय दुसऱ्या भावाने कोणताही निर्णय घेऊ नये, असं दोन्ही भावांना वाटत होते. दोघांमध्ये संवादाचा अभाव होता. यादरम्यान, अनिल अंबानी यांनी वीज निर्मिती प्रकल्पाची घोषणा केली.
मुकेश अंबानी यांच्या संमतीशिवाय हे काम घेण्यात आले आणि त्यामुळे त्यांना धक्का बसला. अनिल अंबानींच्या निर्णयाने नाराज झालेल्या मुकेश अंबानींनी रिलायन्स समूहाच्या अनेक कंपन्यांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. यामधून दोघांमधील तणाव आणखी वाढत गेला. २००४ मध्ये दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला होता.
महत्वाच्या बातम्या :-
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलीने आईची केली हत्या; असा रचला होता ‘कट’, तपास करणारे पोलीसही चक्रावले
खाता का नेता, म्हणणारे हे वडापाव विकणारे चाचा कोण आहे माहितीये का?
पतीने पत्नीचे हात-पाय बांधून शारिरीक संबंध प्रस्थापित केले, कोर्टाने दिला ‘हा’ आदेश