रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आपल्या जुळ्या मुलांसह भारतात परतली आहे. 19 नोव्हेंबर 2022 रोजी ईशाने जुळ्या मुलांना जन्म दिला. कृष्णा आणि आदिया अशी जुळ्या मुलांची नावे आहेत. मुले एक महिन्याची झाल्यानंतर ईशा अंबानी आपल्या मुलांसह भारतात परतली आहे.
आपल्या जुळ्या मुलांसह मुंबईत परतलेल्या ईशा अंबानीच्या स्वागतासाठी तीचे संपूर्ण कुटुंब विमानतळावर पोहोचले. ईशाच्या स्वागतासाठी अंबानी कुटुंबाचे घर सजवण्यात आले आहे. मुलगी ईशा आणि तिच्या मुलांच्या भव्य स्वागतासाठी अंबानी कुटुंबाने विशेष तयारी केली आहे.
ईशा अंबानीने कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथील सेडर सेनेई येथे कृष्णा आणि आदिया या जुळ्या मुलांना जन्म दिला. बातम्यांनुसार, अंबानी कुटुंब मुलांच्या नावावर 300 किलो सोने दान करणार आहे. याशिवाय, अंबानी कुटुंब त्यांच्या घरातील भव्य समारंभात तिरुपती बालाजी, तिरुमला, श्रीनाथजी, नाथद्वारा आणि श्री द्वारकाधीश यांसारख्या भारतातील मोठ्या मंदिरांमधून विशेष प्रसाद देणार आहेत.
ईशाचे लग्न उद्योगपती अजय आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी झाले आहे. ईशा आणि आनंद 12 डिसेंबर 2018 रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. ईशा ही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी आहे.
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तीने वडिलांना रिलायन्सचा व्यवसाय हाताळण्यास मदत करण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर 2014 मध्ये त्यांना रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओच्या बोर्डावर स्थान देण्यात आले. 2020 मध्येच मुकेश अंबानी आजोबा झाले, जेव्हा आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहता हिने 10 डिसेंबरला मुलाला जन्म दिला.
नोव्हेंबरमध्ये मुकेश अंबानी देखील आजोबा झाले आणि आता त्यांच्या घरी त्यांच्या नातवंडांचे भव्य स्वागत आहे. नेट वर्थबद्दल बोलताना, फोर्ब्सने 2018 मध्येच ईशा अंबानीची संपत्ती 70 दशलक्ष डॉलर्स असल्याचा अंदाज वर्तवला होता. रिलायन्स ग्रुपमध्ये वडिलांना मदत करण्यापूर्वी ईशानेही काम केले होते. मॅकिन्से अँड कंपनीमध्ये व्यवसाय विश्लेषक म्हणून त्यांनी न्यूयॉर्कमध्ये काही काळ काम केले.
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्याचा नाद खुळा! दूध विकण्यासाठी खरेदी केले चक्क ३० कोटींचे हेलिकॉप्टर, शेतात उभारले हेलिपॅड
jaykumar gore : स्वत: गंभीर जखमी होऊनही आधी चालकाला अन् सचिवाला रुग्णालयात पाठवलं; आमदार गोरेंचा दिलदारपणा
मुलांना चॉकलेट वाटणाऱ्या सांताक्लॉजला लोकांची बेदम मारहाण; म्हणाले, हिंदू वस्तीत हे चालणार नाही