ऐन कोरोनाच्या संकटात मुकेश अंबानीची ब्रिटनमध्ये फुल्ल टू शॉपिंग; ५९२ कोटींचा रिसॉर्ट केला खरेदी

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैनाम घातले आहे. रुग्णसंख्या वाढत असून आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होत आहे. देशाची परिस्थिती इतकी गंभीर असताना प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे ब्रिटनमध्ये केलेल्या खरेदीमुळे चर्चेत आले आहे.

रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडने ब्रिटनमधील प्रतिष्ठित कंट्री क्लब, लक्झरी गोल्फ रिसॉर्ट आणि स्टॉक पार्क ५.७० कोटी पाऊंड म्हणजेच ५९२ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. त्यांच्या या खरेदीमुळे मुकेश अंबानी चांगलेच चर्चेत आले आहे.

रिलायंस इंडस्ट्रीजने ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी तब्बल ५९२ कोटींची बोली लावली होती. मुकेश अंबानी यांनी खरेदी केलेले लक्झरी गोल्फ रेसॉर्ट जेम्स बाँड आणि ऑरिक गोल्ड फिंगर यांच्यामुळे प्रसिद्ध आहे.

या स्टोक पार्कचा इतिहास जवळपास ९०० वर्षे जुना आहे. १९०८ पर्यंत स्टोक पार्क खाजगी रेसिडेन्सी म्हणून वापरण्यात येत होते. रिलायन्सने ब्रिटनमधला पहिला कौंटी क्लब खरेदी केला आहे. हा ग्रुप इंटरनॅशलन ग्रुपकडून खरेदी करण्यात आला आहे.

स्टोकपार्क हे युरोपमधील सर्वात प्रसिद्ध गोल्फपार्क आहे. इथे अनेक हॉलिवूड चित्रपटांचे शुटींग करण्यात आले. हे पार्क ३०० एकरांमध्ये आहे. तसेच या पार्कमध्ये राहण्यासाठी ४९ बेडरुम्स, स्पा, स्विमिंग पुल, फिटनेस क्लब, या सुविधा आहे.

विशेष म्हणजे २०१३ मध्ये या रिसोर्टला फाईव्ह रेड एए स्टार रेटींग देण्यात आले होते. हॉटेल इंडस्ट्रीला दिले जाणारे हे सर्वोत्तम रेटींग मानले जाते. दरम्यान, या पार्कमध्ये खेळासंबंधीच्या सुविधा निर्माण करणे, वारसास्थळांचा विकास करणे ही सर्व कामे केली जाणार आहे, असे रिलायंस इंडस्ट्रीजने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

रिकामी घरे, बंगले, हॉल, गाळे कोरोना रुग्णांसाठी द्या; अभिनेता भरत जाधवने केले आवाहन
गायिका सुनिधी चौहानने आपल्या नवऱ्यासोबत सुरु असलेल्या वादावर सोडले मौन; म्हणाली…
लोकांना खायला अन्न नाही, अन् तुम्ही पैसे उडवता! लाजा वाटूद्या; अभिनेत्यांवर नवाजूद्दीन संतापला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.