जगातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालकपदाचा पदाचा राजीनामा दिला आहे. आता मुकेश अंबानी यांच्या जागी त्यांचा मुलगा आकाश अंबानीची संचालकपदी निवड करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने यासंदर्भातील माहिती दिली आहे.(Mukesh Ambani resigned from reliance industry )
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काल संध्याकाळी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालकपदाचा पदाचा राजीनामा दिला होता. रिलायन्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी पायउतार झाल्यानंतर संचालकपदी कमिटीने आकाश अंबानीची निवड केली आहे. यावेळी कमिटीने कंपनीतील काही महत्वाच्या पदांमध्ये फेरबदल केला आहे.
रिलायन्स जिओचे अतिरिक्त संचालक म्हणून रामिंदर सिंग गुजराल आणि केव्ही चौधरी यांची कमिटीकडून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रिलायन्स जिओच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पंकज मोहन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती २७ जून २०२२ पासून पुढील ५ वर्षांसाठी असणार आहे.
मागील वर्षी एका मुलाखतीत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ उद्योगसमूह पुढच्या पिढीकडे सोपवण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. रिलायन्स जिओ उद्योगसमूहाचा पुढील संचालक कोण असणार? अशी चर्चा सर्वत्र रंगत होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
आकाश अंबानी यांची रिलायन्स जिओ उद्योगसमूहाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. आकाश अंबानी यांनी ब्राउन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. Jio च्या 4G इकोसिस्टमच्या स्थापनेमध्ये आकाश अंबानी यांची मोलाची भूमिका आहे. 2020 मध्ये, जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांनी Jio मध्ये गुंतवणूक केली होती, आकाशने देखील भारतात जागतिक गुंतवणूक आणण्यासाठी कठोर परिश्रम केले होते.
महत्वाच्या बातम्या :-
..त्यामुळे मी माझ्या प्रत्येक चित्रपटात शर्ट काढतो, इतक्या वर्षांनंतर सलमान खानने उघड केले गुपित
कॅमेऱ्यासमोर पॅन्ट काढून तिने अशा पोज द्यायला सुरूवात केली की.., फोटो पाहून फुटेल घाम
‘या’ वेब सिरीजमधील बोल्ड आणि इंटिमेट सीन्स पाहून चाहते म्हणाले, ‘एकट्यानेच पाहा’