मुकेश अंबानी खरेदी करू शकतात बर्गर आणि सँडविचची ‘ही’ कंपनी, टाटा कंपनीला देणार टक्‍कर

मुंबई । देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आता रेस्टॉरंट व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहेत. पेट्रोकेमिकल्स, केमिकल्स, टेलिकॉम, डिजिटल, ग्रॉसरी, रिटेल, फर्निचर अशा अनेक क्षेत्रात आपला विस्तार करत असताना.

आता मुकेश अंबानी आता सर्व्हिस रेस्टॉरंटच्या व्यवसायात आपले पाय रोवण्याच्या तयारीत आहेत. १ या प्लॅनअंतर्गत मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज सबवे इंक या जगातील सर्वात मोठ्या रेस्टॉरंट चेन कंपनीची भारतातील फ्रॅंचायसी विकत घेण्याच्या प्रयत्नात आहे.

रिलायन्सला या व्यवहारासाठी १५०० कोटी ते १९०० कोटी रुपयांदरम्यानचा खर्च येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. जर रिलायन्स सबवे इंकची फ्रॅंचायसी मिळवण्यात यशस्वी झाली तर ते टाटा समूहाच्या स्टारबक्स आणि ज्युबिलट समूहाला प्रत्यक्ष आव्हान असणार आहे.

कारण टाटांच्या या कंपन्या रिलायन्सच्या नव्या व्यवसायातील थेट प्रतिस्पर्धी कंपन्या असतील. त्याचबरोबर या व्यवसायातील डॉमिनोज पिझ्झा, बर्गर किंग यासारख्या कंपन्यांदेखील रिलायन्सकडून मोठे आव्हान मिळण्याची चिन्हे आहेत.

सबवे इंक ही अमेरिकेतील सर्वात मोठी सिंगल ब्रॅंड रेस्टॉरंट चेन कंपनी आहे. ही कंपनी भारतात फ्रॅंचायसी मॉडेलवर काम करते. रिलायन्स आणि सबवे मधील हा व्यवहार झाल्यास रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल युनिटला संपूर्ण भारतात जवळपास ६०० सबवे स्टोअर मिळतील.

रिलायन्स आपल्या रिटेल व्यवसायाअंतर्गत रेस्टॉरंट श्रेणीमध्येदेखील आपला विस्तार करण्याची योजना बनवते आहे. सबवेने भारतात आपले कामकाज २००१ मध्ये सुरू केले होते. क्युअलआर महसूलात या सेगमेंटमध्ये सबवे चा मार्केटमधील हिस्सा जवळपास ६ टक्के इतका होता.

ताज्या बातम्या

महसूल दिनानिमित्त मोठ्या बदलांची घोषणा, जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, जाणून घ्या नवीन बदल..

राज कुंद्राच्या कंपनीत पुरुषांचं देखील शोषण होत; ‘या’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

सात टाके पडल्यानंतरही मागे नाही हटला हा पठ्ठ्या, वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरशी नडला, पण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.