मुकेश अंबानीच्या घरी पुण्याच्या डेअरीतून जाते दुध; एक लीटर दुधाची किंमत जाणून तोंडात बोटं घालाल

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यामुळे लोकांना त्यांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्याची खुप उत्सुकता असते.

अंबानी कुटुंब काय खाते, कसे राहतात, कसे जगतात, हे जाणून घेण्यासाठी अनेक लोक घडपड करत असतात. मुकेश अंबानी अनेकदा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. पण त्यांच्या घरातील काही गोष्टी अजूनही लोकांना माहित नाहीये. त्यापैकीच एक म्हणजे अंबानी यांच्या घरात कोणत्या डेअरीतून दुध येतं आणि त्याची किंमत काय असते.

मुकेश अंबानी यांच्या घरात प्रत्येक गोष्टी ठरवलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या घरात पुण्यातील देवेंद्र शहा यांच्या भाग्यलक्ष्मी डेअरीतून दूध येते. पुण्यातून फक्त ३ तासामध्ये दुध मुंबईत येते. अंबानी यांच्यासोबतच अनेक लोकांच्या घरी हे दुध सप्लाय केलं जाते.

विशेष म्हणजे भाग्यलक्ष्मी डेअरीने आपल्या ग्राहकांसाठी एक लॉगिन आयडी दिलेला आहे. त्यानुसार ते ऑर्डर कॅन्सल करु शकता, तसेच दुसऱ्या पत्त्यावर दुध मागवू शकतात. तसेच या लॉगिनमुळे ग्राहकांना ऑर्डर बदलताही येते.

भाग्यलक्ष्मी डेअरीचे विशेष म्हणजे या ठिकाणी गायींची विशेष काळजी घेतली जाते. गायींसाठी इथे रबर मॅटही आहे. तसेच गायींना पिण्यासाठी आरओचे पाणी, खाण्यासाठी सोयाबीन, अल्फा गवत, हंगामी भाज्या दिल्या जातात. तसेच गायींसाठी या ठिकाणी २४ तास म्युजिक सुरु असते.

या डेअरीमध्ये २ हजार डच होल्स्टीन प्रजातीच्या गायी आहे. तसेच ही डेअरी २६ एकरात बनली असून याठिकाणी रोज २५ हजार लीटर दुध उत्पादन होते. याठिकाणी सर्व कामे मशीम करतात, उदा. गायींचे दुध काढण्यापासून ते दुध पॅकींगपर्यंत

भाग्यलक्ष्मी डेअरीच्या दुधाची किंमत १५० रुपये प्रतिलीटर आहे. मुकेश अंबानी यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर हे ही भाग्यलक्ष्मी डेअरीचेच ग्राहक आहे. या डेअरीचे मुंबई-पुणे शहरातच १८ हजारांच्या आसपास ग्राहक आहे.

महत्वाच्या बातम्या-

देशातील लसीच्या तुडवड्याला केंद्र सरकारच जबाबदार; सिरम इन्स्टिट्युटने केला खळबळजनक आरोप
VIDEO: प्लास्टिक बाटल्यांच्या मदतीने पोहत आला दुसऱ्या देशात, सैनिकांनी पकडताच म्हणाला…
“मोदींनी प्रचारसभा घेऊन स्वत: कोरोना पसरवला, आणि आता रडत आहेत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.