‘मुझसे दोस्ती करोगी’ चित्रपटात छोट्या करिना कपूरची भुमिका निभावलेली अभिनेत्री आज दिसते ‘अशी’

बॉलीवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यांनी लहानपणी बालकलाकार म्हणून काम केले आहे. लहानपणी त्यांना बालकालाकार म्हणून खुप पसंत केले गेले होते. त्यातले अनेक बालकलाकार आज इंडस्ट्रीतले मोठे स्टार आहेत. जसे की, आलिया भट्ट, कुणाल खेमू.

अनेकांना यश मिळाले तर काही कलाकार आजही मेहनत आहेत. लहानपणी स्टार असणारे कलाकार मोठे झाल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण करु शकले नाही. अशीच एक बालकलाकार म्हणजे बरखा सिंग. खुप कमी लोकांना माहीती असे की, युट्यूबर बरखा सिंगने देखील बॉलीवूडमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे.

१९ वर्षांपूर्वी बरखाने तिच्या अभिनय क्षेत्रातील सुरुवात केली होती. तिने यश राज फिल्मसची निर्मिती असणाऱ्या ‘मुझसे दोस्ती करोगी’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. या चित्रपटात करिना कपूरच्या लहानपणीची भुमिका बरखाने निभावली होती.

या चित्रपटात ती छोटी टिना बनली होती. हा चित्रपट हिट झाला होता. त्यामूळे बरखाला देखील इंडस्ट्रीमध्ये चांगलीच ओळख मिळाली होती. पण त्यानंतर मात्र तिने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आणि शिक्षण पुर्ण केले. शिक्षण पुर्ण केल्यानंतर परत एकदा अभिनयात प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वीच बरखाला तिच्या बालकार म्हणून काम केलेल्य अनूभवाबद्दल विचारण्यात आले. बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करताना तिला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला असा प्रश्न तिला विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना बरखा म्हणाली की, ‘मला काही अडचणी झाली नाही. कारण मी लहानपणी मस्करी म्हणून काम केले होते. अभिनय करायचा म्हणून केले नव्हते. मी जास्त चित्रपट केले नाहीत किंवा एखाद्या प्रसिद्ध शोचा भाग देखील मी नव्हते. महत्वाचे म्हणजे मी प्रसिद्ध बालकलाकार नव्हते’.

तिने पुढे सांगितले की, ‘मी लहानपणी फिरायला भेटेल आणि खायला भेटेल म्हणून चित्रपट केला होता. ऑडिशन दिले तर आई मला आईस्क्रिम घेऊन देणार होती. ती आईस्क्रिम खाण्यासाठी मी ऑडिशन दिले होते. सिलेक्शन झाल्यानंतर मला वाटल की, मी करिना, राणी आणि ह्रतिक रोशनला भेटणार. त्यासाठी मी खुप उत्साही होते’.

‘एक चित्रपट केल्यानंतर मी ब्रेक घेतला आणि अभ्यासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अनेक वर्ष मी चित्रपटांपासून दुर होते. म्हणून लोकं मला विसरुन गेले. मी बालकलाकार म्हणून कोणाच्याही लक्षात नव्हते. त्यामूळे माझा प्रवास नवीन होता. याच कारणामूळे मला अडचणींचा सामना करावा लागला नाही’. असे देखील बरखाने सांगितले.

बरखा आत्ता मोठी झाली आहे. ती अभिनेत्री आणि युट्यूबर म्हणून इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. बरखा आत्ता खुपच सुंदर दिसते. लहानपणीची बरखा आणि आत्ताची बरखा यात खुप मोठा फरक आहे. २०१३ मध्ये तिने अभिनय क्षेत्रात डेब्यू केला होता. आज ती प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.

महत्वाच्या बातम्या –
साऊथची टॉपची अभिनेत्री तृषा आणि राणा दग्गूबत्तीचे ‘या’ कारणामूळे होऊ शकले नाही लग्न
फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्तीचा जीन्सवरील डान्स तुफान व्हायरल; पहा व्हिडीओ
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राची मुलगी आदिरा आहे बॉलीवूडची सर्वात श्रीमंत स्टार किड; बर्थडेला गिफ्ट मिळाला बंगला
उद्योगपतीच्या अंत्यसंस्कारात रडण्याचे मिळणार होते ५ लाख; चंकी पांडेने केला गोप्यस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.