Share

ट्रोलर म्हणाला, ‘दारू पिऊन मालिका लिहीता का?’ ‘आई कुठे काय करते?’ च्या लेखिकेने दिले सडेतोड उत्तर

mugdha-godbole.

बहुतेक टीव्ही मालिकांना प्रेक्षकांकडून टीकेचा सामना करावा लागतो. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेला प्रेक्षक सध्या ट्रोल करत आहेत. या ट्रोलिंगवर मालिकेच्या सवांद लेखिका मुग्धा गोडबोले यांनी मत व्यक्त केलं आहे. प्रेक्षकांच्या विरोधी प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहिल्यानंतर खूप वाईट वाटते, अशी भावना मुग्धा गोडबोले यांनी व्यक्त केली आहे.(mugdha godabole answer to trollers)

काही दिवसांपूर्वी ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेला प्रेक्षकांनी ट्रोल केले होते. ‘पहाटे उठून दारू पिऊन मालिका लिहीता का? असा सवाल प्रेक्षकांनी मालिकेच्या लेखिकेला विचारला होता. यावर मालिकेच्या लेखिका मुग्धा गोडबोले यांनी एक समर्पक उत्तर दिलं आहे. एका मुलाखतीत लेखिका मुग्धा गोडबोले यांनी प्रेक्षकांच्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.

या मुलाखतीत या मालिकेबाबत बोलताना लेखिका मुग्धा गोडबोले म्हणाल्या की, “खरं तर मालिकेचा विषयच खूप वेगळा होता. कारण सुरवातीला जेव्हा या मालिकेबाबत विचारण्यात आले. त्यावेळी काय काय लिहायचं याबाबत संभ्रम होता. ही मालिका चाळीशी ओलांडलेल्या स्त्रीवर आधारित होती. त्यामुळे या मालिकेत विनोदी किंवा मजेशीर प्रसंग नसणार याची खात्री होती.”

मुग्धा गोडबोले पुढे म्हणाल्या की, “आई कुठे काय करते? ही मालिका एका बंगाली मालिकेवर आधारित आहे. त्यामुळे या मालिकेचे काही भाग बघितले आणि मालिकेतील एक एक पात्र लेखनातून पुढं येत राहिले. सुरवातीला मालिका पाहिल्यावर अनेक महिलांनी खूप छान प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली होती. माझ्या लेखनाचे कौतुक देखील झाले होते.”

या मुलाखतीत मालिकेच्या लेखिका मुग्धा गोडबोले यांनी प्रेक्षकांच्या ट्रोलिंगवर देखील भाष्य केलं. लेखिका मुग्धा गोडबोले म्हणाल्या की, “काही प्रेक्षक मालिकेवर टीका देखील करत होते. पण मालिका लिहिणं ही साधी गोष्ट नाही. रोज अर्धा तास प्रेक्षकांसमोर काय आणायचं याचा प्रश्न आम्हाला नेहमीच पडत असतो. प्रेक्षकांसमोर असे मुद्दे मांडणं हे काही सोपं काम नाही.”

मालिका लिखाणाबाबत बोलताना मुग्धा गोडबोले म्हणाल्या की, “मला स्वतःला एल एपिसोड लिहायला ५ ते ६ तास लागतात. जेव्हा अशा २ ते ३ मालिका मी लिहिते. तेव्हा माझे दिवसातले १५ तास खर्च होतात. केवळ दोन तासासाठी हे काम नसून तुम्हाला फुल टाइम वेळ द्यावा लागतो. पण तरीसुद्धा लोकांना या क्षेत्रात यायचंय याचा मला आनंद आहे”, असे मुग्धा गोडबोले यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
आम आदमी पार्टीची क्रेझ! चिमुकल्याने केजरीवाल लुकमध्ये साजरा केला ऐतिहासिक विजय, पहा फोटो
लग्नाच्या दोन वर्षातच पतीचं लिंग बदलून त्याला बनवलं मुलगी, प्रकरण बिघडल्यावर म्हणाली, ‘मला तुझा काही उपयोग नाही’
अभिनेता सकाळी म्हणाला, योगीजी आज तुमचा शेवटचा दिवस आहे; कल समोर येताच घेतला युटर्न

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now