Share

“माझ्या एकुलत्या एक मुलाला गोळ्या का घातल्या? त्याचा गुन्हा काय होता?”, आईचा सरकारला संतप्त सवाल

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात शुक्रवारी झारखंडचे(Zarkhand)  राजधानी असलेल्या रांचीमध्ये आंदोलन झाले होते. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. यावेळी गोळ्या लागल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. (muddsir aalam mother ask question to government)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रांची मध्ये झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान मुदस्सीर आलम आणि साहिल या दोघांना गोळी लागली होती. गोळी लागल्यानंतर दोघांना जवळच्या रांचीमधील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मुदस्सीर आलमच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.

मुदस्सीर आलमच्या कुटुंबाची अवस्था वाईट झाली आहे. मुदस्सीर हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या संपूर्ण घटनेवर मुदस्सीर आलमच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा मुलगा खूप चांगला होता. त्याला का गोळ्या घातल्या? त्याचा गुन्हा काय होता? असा सवाल मुदस्सीर आलमच्या कुटूंबियांना सरकारला विचारला आहे.

मुदस्सीर आलमच्या आईने सांगितले की, “तो माझा एकुलता एक मुलगा होता. गरिबी असल्यामुळे आम्हाला त्याला नीट शिकवता आले नाही. पण माझा मुलगा खूप चांगला होता. त्याला का गोळ्या घातल्या ? त्याचा गुन्हा काय होता?,”असे मुदस्सीर आलमच्या आईने सांगितले आहे. यावेळी आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी देखील मुदस्सीर आलमच्या आईने सरकारकडे केली आहे.

मुदस्सीर आलमच्या मृत्यूला झारखंड सरकार जबाबदार आहे. आंदोलकांवर गोळ्या का झाडल्या? पोलिसांनी गोळ्या झाडल्यामुळे मुदस्सीर आलमचा मृत्यू झाला, असा आरोप त्याचे काका मोहम्मद शाहिद यांनी केला आहे. मुदस्सीर आलमचे काका मोहम्मद शाहिद हे एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत.

रांचीमध्ये झालेल्या हिंसाचारात गोळी लागल्याने आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्या तरुणाचे नाव साहिल असे आहे. साहिलच्या कुटूंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल एका दुकानात नोकरी करत होता. कामावरून घरी परत येत असताना त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. पोलिसांना रबर गोळ्या सोडण्याऐवजी थेट गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले, असा आरोप साहिलच्या कुटूंबियांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
राज्यसभा निवडूणूकीत क्राॅस मतदान केल्यामुळे ‘या’ काॅंग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी
मुंबईत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली प्रसिद्ध अभिनेत्री; ढसाढसा रडत पतीवर केले गंभीर आरोप
आलियाला सून करुन रणबीरच्या आईला होतोय पश्चाताप; म्हणाली, लग्न झाल्यापासून ती….

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now