मोठी बातमी! मुंबईत आढळले म्युकरमायकोसिसचे २९ रुग्ण, ४ रुग्णांचा झाला मृत्यु

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रोज साडे तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्युही होत आहे. असे असतानाच काही राज्यांमध्ये कोरोनानंतर रुग्णांना फंगसचा (म्युकरमायकोसिस) आजार उद्भवत आहे. त्यामुळे काही लोकांचा मृत्यु देखील झाला आहे.

असे असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईत पण म्युकरमायकोसिसची रुग्ण वाढतंच चालले आहे. मुंबईत २९ रुग्ण भेटले असून ४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामुळे पुर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईत आढळलेल्या २९ रुग्णांपैकी १४ रुग्ण हे नवी मुंबई मनपा हद्दीतले आहे. तर इतर १५ रुग्ण हे मुंबईच्या बाहेर आहे. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर ५ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नवी मुंबईतील हे सर्व रुग्ण १० मेनंतर आढळून आले आहे. तसेच त्या सर्व रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या रुग्णांपैकी ३५ टक्के रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे, असा दावा प्रशामसनाने केला आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतर काही रुग्णांना या रोगाची लागण होताना दिसत आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण भेटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हा कोरोनापेक्षाही भयानक असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. असे असतानाच म्युकरमायकोसिस या आजारामुळे सगळीकडे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

माधूरी दिक्षित ‘धक धक करने लगा’ या गाण्यात ‘आऊच’ का म्हणाली?; तब्बल ३० वर्षांनंतर झाला खुलासा
कहाणी त्या गुप्तहेराची जो दुसऱ्या देशाचा संरक्षणमंत्री बनणार होता, पण एका चुकीमूळे झाला भांडाफोड
छत्रपतींचे वंशज असलेल्या खासदार संभाजीराजेंच्या मागे मराठा समाज का उभा आहे?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.