काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी वाचा या ३ सोप्या गोष्टी, तज्ज्ञांनी दिलाय महत्त्वाचा सल्ला

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटाने देशात थैमान घातले आहे. अशात आता काळी बुरशी किंवा म्युकर मायकोसीस या नव्या आजाराने चिंता निर्माण केली आहे. कोविड रिकव्हरीनंतर काळ्या बुरशीचे वेगाने रुग्णामध्ये संक्रमण होत आहे. दरम्यान यावर उपचार काय? आणि काळ्या बुरशीला कसा प्रतिबंध करता येईल असे प्रश्न अनेकांच्या मनात येत आहेत.

जे लोक नुकतेच कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत त्या रुग्णांमध्ये म्युकोर  मायकोसिस आढळत आहेत. जे रुग्णालयात अधिक काळ ऑक्सिजनवर अवलंबून आहेत किंवा ज्यांची शुगर लेवल वाढली आहे असे लोक म्युकोर मायकोसिस आढळतात.

ऑक्सिजन मास्कसारख्या उपकरणाच्या खराब स्वच्छतेमुळे हा आजार होऊ शकतो. यासाठी काही सोप्या ओरल हायजीन टिप्स फॉलो करुन डेंटीस्टच्या सल्ल्यानुसार हा दुर्मिळ परंतु जीवघेणा आजार होण्याची शक्यता कमी होऊ शकते. याचे प्रमुख कारण म्हणजे काळ्या बुरशीच्या लक्षणांमध्ये ओरल टीश्यूज, जीभ आणि हिरड्यांचे रंगद्रव्य समाविष्ट आहे.

काळी बुरशीच्या लक्षणांमध्ये नकाच्या तीव्र वेदना, चेहऱ्यावर सूज, डोळ्याखाली जळजळ होणे, अस्वस्थता, ताप, आणि डोकेदुखी यांचा समावेश आहे.

तोंडाची स्वच्छता राखणे:
कोविड-१९ मधून बरे झाल्यानंतर स्टिरॉइड्स आणि इतर औषधांचे सेवन केल्याने बॅक्टेरिया आणि बुरशीची तोंडात वाढ होते. यामुळे सायनस, फुफ्फुसात आणि मेंदूमध्येही समस्या उद्भवतात. दिवसातून कमीत कमी दोन किंवा तीन वेळा ब्रश करुन तोंडाची काळजी घेतल्यामुळे आपल्याला बॅक्टेरिया नियंत्रित करत येऊ शकतात.

कोविड १९ मधून बरे झाल्यानंतर तुमचा जुना टूथब्रश वापरणे टाळा. तसेच कोविड संक्रमित रुग्ण किंवा त्यातून बरे झालेल्या रुग्णांनी आपले टूथब्रश कुटुंबातील अन्य लोक ठेवतात त्याठिकाणी ब्रश ठेवू नये. अँटीसेप्टीक माउथवॉश वापरून ब्रश आणि टंग क्लिनर वारंवार स्वच्छ करण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जात आहे.

काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी प्रथम साखरेचे नियंत्रण खूप चांगले असावे, दुसरे म्हणजे आपण स्टिरॉइड्स कधी द्यायचे याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे आणि तिसरे म्हणजे स्टिरॉइड्सचा हलका किंवा मध्यम डोस द्यावा. तसेच काळ्या बुरशीची लक्षणे ओळखून त्यापासून स्वत:चे संरक्षण करणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! मुंबईत आढळले म्युकरमायकोसिसचे २९ रुग्ण, ४ रुग्णांचा झाला मृत्यु
त्या ८ महिन्यांच्या गरोदर होत्या, मात्र दिवस-रात्र काम करून बनवले कोरोना चाचणीचे किट
धक्कादायक! लसींमुळेच निर्माण होतायत कोरोनाचे नवे व्हेरिएंट, प्रसिद्ध साथरोग तज्ज्ञाचा दावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.