Share

MSRTC Recruitment 2025 : एसटी महामंडळात ३६७ जागांसाठी भरती; तुम्ही अर्ज केला का? जाणून घ्या माहिती

MSRTC Recruitment 2025 : महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) या सरकारी संस्थेमध्ये तब्बल ३६७ पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ११ ऑगस्ट २०२५ ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. पात्र उमेदवारांना http://www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

 कोणत्या पदांसाठी भरती?

ही भरती प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदांसाठी असून खालील विविध ट्रेडसाठी ही संधी आहे:

  • अभियांत्रिकी पदवीधर (Engineering Graduate)

  • मेकॅनिक मोटार व्हेईकल (Mechanic Motor Vehicle)

  • शिट मेटल वर्कर (Sheet Metal Worker)

  • ऑटो इलेक्ट्रिकल अ‍ॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स (Auto Electrical and Electronics)

  • वेल्डर – गॅस व इलेक्ट्रिक (Welder – Gas and Electric)

  • पेंटर (Painter)

  • मेकॅनिक डिझेल (Mechanic Diesel)

  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Electronics Mechanic)

  • मेकॅनिक रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग (Mechanic Refrigeration and AC)

  • इलेक्ट्रीशियन (Electrician)

  • फिटर (Fitter)

  • टर्नर (Turner)

  • कारपेंटर (Carpenter)

 पात्रता काय असावी?

उमेदवारांनी ITI, अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्याचे वय १४ ते ३० वर्षांदरम्यान असावे.

 अर्ज कसा करायचा?

  1. सर्वप्रथम, उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी (Registration) करायची आहे.

  2. त्यानंतर, अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.

  3. भरलेला अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय, एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक (Nashik) येथे ऑफलाइन पद्धतीने सबमिट करायचा आहे.

 भरतीचे ठिकाण

संपूर्ण प्रशिक्षण नाशिक येथे दिले जाणार आहे. उमेदवारांनी वेळेवर अर्ज सादर करून संधी मिळवावी.

ऑनलाईन नोंदणीसाठी येथे क्लिक करा

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now