उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आलेल्या धमकीच्या मेसेजने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याचे धमकी देण्याचा निनावी मेसेज पोलीस कंट्रोलरूममध्ये आला आहे.
एका तरुणाने पोलीस कंट्रोल रुम ११२ च्या व्हॉट्सॲपवरवर मेसेज केला आहे. २४ तासांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्याची धमकी दिली आहे. तर शोधू शकत असाल तर शोधून दाखवा. असाही पोलिसांना इशारा दिला आहे.
शनिवारी रात्री ८ वाजून ७ मिनिटाला एका मोबाईल नंबरवरुन मेसेज आला. यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धकमी देण्यात आली होती. यामध्ये म्हणण्यात आलं होतं की, ”योगी आदित्यनाथ यांची २४ तासात हत्या केली जाईल, हिंमत असेल तर शोधून दाखवा. एके ४७ ने २४ तासांच्या आत त्यांना मारुन टाकेन”.
या प्रकरणी रविवारी सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात एफआय़आर दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यापूर्वीही अनेकदा धमक्या आल्या आहेत. योगी आदित्यनाथ दहशतवाद्यांचे हिट लिस्टवर आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी लागते. योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेमध्ये उत्तरोत्तर वाढ करण्यात आली आहे.
‘राज ठाकरेंच्या जीवाला पाकिस्तानी दहशतावाद्यांकडून धोका’
“फडणवीसांची लोकप्रियता सरकारला खुपते म्हणूनच आकसबुद्धीने सुरक्षा कपातीचा निर्णय घेतला”
महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा धोका वाढला! ८०० कोबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच; अहवालात स्पष्टीकरण