सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महावितरणमध्ये ७००० पदांसाठी भरती, असा करा अर्ज

मुंबई | कोरोना काळात अनेक पदांची भरती प्रक्रिया रखडली आहे. यामुळे अनेक शिक्षित तरुण सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशात आता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडमध्ये विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक अशा पदांसाठी मेगा भरती करण्यात येत आहे.

त्याअंतर्गत एकूण सात हजार पदे भरली जाणरा आहेत. यामध्ये पाच हजार विद्युत सहाय्यक आणि दोन हजार उपकेंद्र सहाय्यकाच्या पदांसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी https://www.mahadiscom.in/en/home/ या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

याबाबत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड कपंनीकडून (MAHADISCOM) या भरतीची अधिसूचना काढण्यात आली आहे. यानुसार ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १८ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटी तारीख १८ मार्च २०२१ पर्यत असणार आहे.

या पदांसाठी उमेदवारचे कमीत-कमी वय १८ वर्षे तर जास्तीत जास्त वय २७ वर्ष असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासांठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षांनी वाढवण्यात आली आहे. तर माजी कर्मचारी आणि दिव्यांगासाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण असावा. तसेच राष्ट्रीय व्यापार प्रशिक्षण प्रमाणपत्र(NTTC) असणे आवश्यक आहे. या दोन्ही पदांसाठी १८ ते २७ हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे. यासोबत भरती संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता.

महत्त्वाच्या बातम्या-
‘नोकरीची संधी एका क्लिकवर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ पोर्टलचे उद्घाटन’
दुचाकी, चारचाकी किंवा जमीन आहे अशा कुटुंबाचे रेशनकार्ड रद्द होणार? वाचा काय आहे नियम
केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेत शेतकऱ्यांना मिळणार ३६,००० रुपये पेन्शन, असा करा अर्ज..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.