भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या(MS Dhoni) घरी नवीन पाहुणी आली आहे. महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत यासंदर्भातील महिती दिली आहे. साक्षी धोनीने सोशल मीडियावर या नवीन पाहुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.(ms dhoni wife sakshi dhoni shear new guest video on social media)
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे रांची इथे एक फार्म हाऊस आहे. महेंद्रसिंग धोनी या फार्म हाऊसवर आपल्या कुटूंबियांसोबत नेहमीच जात असतो. महेंद्रसिंग धोनीना प्राणी फार आवडतात. त्याच्याजवळ पाच कुत्रे आणि दोन घोडे आहेत.
आता यामध्ये एका बकरीचा देखील समावेश झाला आहे. या बकरीचा व्हिडिओ महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी या व्हिडिओला लाइक केलं आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे.
एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की, “महेंद्र सिंग धोनीच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.” मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंग धोनीने ही बकरी गुजरातमधून आणल्याचे सांगितले जात आहे. महेंद्रसिंग धोनीने मागील वर्षी दोन बकऱ्या घेतल्या होत्या. पण त्यांना रांचीमधील फार्म हाऊसमध्ये आणले नव्हते.
पण आता महेंद्र सिंग धोनीने या बकऱ्यांना फार्म हाऊसवर आणले आहे. महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी साक्षी धोनीने एका पक्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
आयपीएल २०२२ मध्ये महेंद्रसिंग धोनी कर्णधार असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी सुमार राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाला क्वालिफायर फेरीत देखील प्रवेश करता आला नाही. यंदाच्या आयपीएल हंगामात महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवले होते,. पण काही सामन्यानंतर जडेजाने कर्णधारपद पुन्हा महेंद्रसिंग धोनीकडे सोपवले.
महत्वाच्या बातम्या :-
”सदावर्तेंसारख्या बाजारूला काय कळणार पवार साहेब, त्यासाठी चांगली दृष्टी व लायकी लागते”
पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; राष्ट्रवादीचा सदाभाऊंना खोचक टोला
VIDEO: काश्मीरमधील तो कॅफे ज्याला इंडियन आर्मी चालवते, स्वतः आनंद महिंद्रांनी दिलेत 10 स्टार, म्हणाले..






