Share

‘शेर शिवराज’ला मिळत असलेले प्रेम पाहून मृण्मयी देशपांडेने मानले प्रेक्षकांचे आभार; म्हणाली,…

sher shivraj

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी कमाई करत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी सिनेमागृह हाऊसफुल्ल झाले आहेत. तसेच या चित्रपटातील कलाकारांचे आणि दिग्दर्शनाचेही कौतुक करण्यात येत आहे. यादरम्यान अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने एक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांच्या या प्रेम आणि पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानले आहे.

‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रदर्शनापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने १.०५ कोटींचा गल्ला जमवला. तसेच अद्यापही शोचे अॅडव्हान्स बुकिंग झाले असून सिनेमागृह हाऊसफुल्ल झाले आहेत. याशिवाय अनेक शिवप्रेमी आणि ‘शेर शिवराज’ चित्रपटाचे चाहते यासंदर्भात पोस्ट शेअर करत चित्रपट नक्की पाहण्याचा आग्रह करत आहेत.

यादरम्यान चित्रपटाला मिळत असलेल्या या प्रेमासाठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअऱ केली. ही पोस्ट अनिल वालिव नावाच्या एका व्यक्तीने लिहिलेले आहे.

यामध्ये लिहिलेले आहे की, ‘शिवछत्रपतींचा तो सुवर्णकाळ आपणासमोर मांडायचा चंग आणि हौस या लोकांची आहे. आपण त्यांच्या या कलाकृतीचे कौतुक करूया. हा सुवर्णकाळ प्रत्यक्ष अनुभवूया. चित्रपटाची कथा, केंद्रबिंदू कितीही गौरवशाली, प्रेरणादायी असला तरी चित्रपटाचे यश हे बॉक्स ऑफिसवरील कामगिरीवरच ठरते. आणि इथेच आपली खरी गरज आहे’.

https://www.instagram.com/p/Cc-k4yxBZfH/

‘आपण आपला प्रेरणादायी भूतकाळ अजूनही आपल्या ह्रदयात जिवंत ठेवतो याचा प्रत्यय द्यायची वेळ आली आहे. आवर्जून हा चित्रपट पाहा आणि या चित्रपटातील कलाकारांच्या पाठीशी राहा. आपल्या महाराजांचं कौतुक या टीमच्या नजरेतून पहा. धन्यवाद’.

मृण्मयीने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण अनुभवण्यासाठी नक्की पाहावा असा शेर शिवराज. या प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद’. यासोबत मृण्मयीने अनेक हॅशटॅग वापरत चित्रपट यशस्वीरित्या सिनेमागृहात चालत असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, मृण्मयी देशपांडेने ‘शेर शिवराज’ या चित्रपटात केसर ही भूमिका साकारली आहे. केसर ही एक गुप्त सैनिक असून ती स्वराज्यासाठी काम करते. छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत शत्रूची माहिती पोहोचवणारी गुप्तहेर म्हणून या चित्रपटात तिने मोठी भूमिका बजावली आहे. तर तिच्या या पात्राचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
महाराष्ट्र दिनी महेश मांजरेकरांची महाघोषणा; घेऊन येताहेत बिगबजेट चित्रपट ‘वीर दौडले सात’
ऋषी कपूरचा विषय निघताच भावूक झाल्या नीतू कपूर, रडत-रडत म्हणाल्या, रोज कोणी ना कोणी..
टॉपलेस होऊन वॉकला निघाली उर्फी जावेद, मागे वळताच थांबला सगळ्यांचा श्वास, पहा व्हिडीओ

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now