झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मालिकेतील कलाकारांचा अभिनय देखील प्रेक्षकांना खुप आडत आहे. अल्पवधीतच मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एख वेगळे स्थान निर्णाण केले आहे.
मालिकेत मुख्य भुमिका अभिनेता विराजस कुलकर्णी साकारत आहे. त्याने साकारलेल्या आदित्यच्या भुमिकेला प्रेक्षक खुप पसंत करत आहेत. त्याचा उत्तम अभिनय या भुमकिलेला जिवंत करत आहे. त्यामूळे विराजसचा चाहता वर्ग चांगलाच वाढला आहे.
खुप कमी लोकांना माहीती आहे की, विराजसला त्याच्या घरातूनच अभिनयाचे धडे मिळाले आहेत. कारण तो प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. त्यामूळे लहानपणापासूनच त्याला अभिनयात आवड निर्माण झाली होती.
२५ जुन १९९२ ला विराजसचा जन्म पुण्यात झाला होता. त्याने त्याचे शालेय शिक्षण पुण्यातून पुर्ण केले. त्यासोबतच त्याने त्याचे महाविद्यालयिन शिक्षण पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेजमधून पुर्ण केले आहे. कॉलेजमध्ये असतानाच त्याने नाटकांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली होती.
कॉलेजमध्ये असताना त्याने थेटर ऑन इंटरटेन्मेंटची स्थापना केली. त्यानंतर त्याने मृणाल कुलकर्णीसोबत त्यांच्या ‘रमा माधव’ चित्रपटामध्ये आसिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. सध्या तो गौतमी देशपांडेसोबत झी मराठीवरील माझा होशील ना मालिकेत काम करत आहे.
या मालिकेत विराजस आदित्यची भुमिका साकारत आहे. तर गौतमी सई नावाची भुमिका निभावत आहे. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे. त्यांच्या जोडीमूळे ही मालिका खुप गाजत आहे.
अभिनयासोबतच विराजसला निर्मिती, दिग्दर्शन आणि लिखानाची आवड आहे. त्याला मालिकेत काम करण्याअगोदर अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच त्याने चित्रपटामध्ये देखील काम केले आहे.
२०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘हॉस्टेल डेज’ चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने ‘माधूरी’ चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर २०२० मध्ये त्याने माझा होशील ना मालिकेतून टेलिव्हिजनवर डेब्यू केला.
महत्त्वाच्या बातम्या –
जाणून घ्या ‘माझा होशील ना’ मालिकेतील सई म्हणजेच गौतमी देशपांडेबद्दल बरचं काही
जाणून घ्या कुठे गायब झाली सलमान खानची ‘सनम बेफवा’ चित्रपटातील अभिनेत्री चांदनी
धर्मेंद्रच्या दोन्ही मुलांंचे आणि नातवांचे शिक्षण आहे खुपच कमी; वाचून तुम्हाला धक्का बसेल
जाणून घ्या राम अरुण गोविल यांची एकूण संपत्ती; आकडा वाचून बसेल धक्का