Share

Sanjay Raut on Ajit Pawar : मिस्टर अजित पवार कुठे गेली तुमची शिस्त? तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on Ajit Pawar : माढा तालुक्यातील कुर्डू (Kurdu village Madha) गावात अवैध मुरुम उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा (Anjali Krishna IPS) गेल्या होत्या. मात्र तेथे ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP party) कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा वाद झाला. या दरम्यान कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Deputy CM) यांना फोन लावला आणि व्हिडिओ कॉलवरून अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पवार यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप होत असून, त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut MP) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला की, शिंदे आणि पवार यांच्या सोबत असलेले अनेक लोक हे चोर, डाकू, तस्कर आणि बलात्कारी आहेत. यांना संरक्षण देण्यासाठीच हे सत्तेत आहेत. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, सुनील शेळके (Sunil Shelke MLA) यांच्या मावळमधील खनिजकर्म प्रकरणात बेकायदेशीर खाणकाम होत असून, यामधून सरकारला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. या गैरप्रकारांना अजित पवारच संरक्षण देत आहेत.

राऊत पुढे म्हणाले, “७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप स्वतः नरेंद्र मोदी (Narendra Modi PM) यांनी अजित पवारांवर केला होता. आज हेच उपमुख्यमंत्री एका तरुण आयपीएस अधिकाऱ्याला दम देतात. ते नेहमी म्हणतात की शिस्त महत्त्वाची आहे. मग हे काय चाललंय? मिस्टर अजित पवार, तुमची शिस्त कुठे गेली?”

राऊत यांनी ठणकावून सांगितलं की, अशा प्रकारे एका आयपीएस अधिकाऱ्याला दम देणे म्हणजे बेकायदेशीर कृत्यांना संरक्षण देणं आहे. राज्याच्या तिजोरीला लुटण्याचा हा प्रकार असून, अजित पवार स्वतः अर्थमंत्री असताना त्यांनी नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा द्यायला हवा. “या आधी अशा नैतिक मुद्यांवर अनेकांना पद सोडावे लागले आहेत. मग अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार कसा?” असा सवाल त्यांनी केला.

यावर आणखी टीका करताना राऊत म्हणाले, “या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणवून घेणारे लोकच आयपीएस अधिकाऱ्याला बेकायदेशीर कामासाठी दडपण आणत आहेत. हेच लोक इतरांना कायदा शिकवतात. हे प्रशासनाला भ्रष्टाचाराकडे ढकलणारे आहे. आज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला असून, उरलेला भाग त्यांच्या हस्तकांकडून लुटला जावा यासाठी दबाव आणत आहेत.” त्यांच्या मते, हे वर्तन महाराष्ट्राच्या सुसंस्कृत प्रशासनाला काळिमा फासणारं आहे आणि मंत्र्यांनी लाज वाटून पाऊल मागे घ्यायला हवं.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now