MPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षेचं आयोजन

पुणे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली असून ४ सप्टेंबरला संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना विषाणूचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अशातच करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ९ एप्रिलला होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून देखील सातत्यानं परीक्षा कधी आयोजित केली जाणार यांसदर्भात विचारणा केली जात होती.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि राज्य सरकारकडून लागू कऱण्यात आलेले कठोर निर्बंध यामुळे परीक्षा होणार की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत होता. मात्र, परीक्षा होणार असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं होत.

शेवटी आज परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली असून ४ सप्टेंबरला संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे आता एमपीएससीच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.