मोठी बातमी! एमपीएससीची परीक्षा ८ दिवसातच होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई | राज्यभरात आज दिवसभर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. १४ तारखेला होणाऱ्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.

या परीक्षेची तारीख उद्याच जाहीर होणार असून परीक्षा येत्या ८ दिवसांच्या आतच घेण्यात येईल असे वचन मुख्यमंत्री ठाकरे यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिले आहे.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, परीक्षा पुढे ढकलण्याचे कोरोना हेच कारण आहे. परंतु उद्याच (शुक्रवारी) नवी तारीख जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवावा. ज्या विद्यार्थ्यांना परिक्षेला परवानगी दिली आहे त्यांना वयोमर्यादेची अट आड येणार नाही. असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, परीक्षेसाठी अवघे तीन दिवस बाकी असताना अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी नाराज झाले त्यांनी रस्त्यावरच ठिय्या सुरू केला. गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे सर्व शाळा, महाविद्यालये आणि अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

याचा फटका MPSC च्या उमेदवारांना देखील बसला. परंतु यावर्षीही पुन्हा मार्च महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा पुण्यात रास्ता रोको, परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी गोपीचंद पडळकर रस्त्यावर; पुण्यात ठिय्या आंदोलन
एमपीएससीची परीक्षा झालीच पाहीजे; रोहीत पवारांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात थोपटले दंड

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.