Share

Udayanraje Bhosale : 10 वर्षांची शिक्षा, अजामीनपात्र गुन्हा; शिवरायांबद्दल बेताल वक्तव करणाऱ्यांना धडा शिकवा; उदयनराजेंची अमित शाहांकडे मागणी

Udayanraje Bhosale : शिवरायांच्या अपमानाच्या मुद्द्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन सादर केले. त्यांनी या निवेदनात राज्यातील महापुरुषांचा अपमान, औरंगजेबाबद्दल गोडवे गाणारी वक्तव्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेली बेताल टिपण्णी यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना किमान 10 वर्षांची शिक्षा असणारा अजामीनपात्र कायदा लागू करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्र्यांसमोर या विषयावर आपले विचार मांडले. त्यांच्या म्हणण्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्वधर्म समभावाचा विचार केला आणि लोककल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले. परंतु काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी त्यांचा, तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा अवमान केला आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ढासळत असून समाजात तणाव निर्माण होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, “आम्ही संयम राखला असला तरी अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी केंद्र व राज्यशासनाने मकोका/टाडा सारखा अजामिनपात्र कायदा लागू करावा. यामध्ये 10 वर्षांची कडक शिक्षा आणि मोठा दंड असावा.” त्यांनी केंद्रीय आणि राज्य सरकारांना छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा इतिहास अधिकृतपणे प्रसिध्द करण्याची आवश्यकता व्यक्त केली, तसेच ऐतिहासिक चित्रपट, वेबसिरीज व डॉक्युमेंटरीजसाठी इतिहासकारांची समिती स्थापन करावी अशी मागणी केली.

उदयनराजे भोसले यांनी आणखी एक महत्त्वाची मागणी केली आहे, ती म्हणजे दिल्लीतील राष्ट्रीय स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य दाखवणारा संग्रहालय उभारणे. या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्य, युद्धनीती, शस्त्रास्त्रांची माहिती, अप्रकाशित दस्तावेज आणि कलाकृती समाविष्ट असाव्यात, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली.

याशिवाय, शहाजीराजे भोसले यांची समाधी कर्नाटकमधील असलेल्या त्यांच्या अंतिम श्वास घेतलेल्या ठिकाणी दुर्लक्षित आहे. त्यांचं समाधी क्षेत्र योग्य रितीने विकसित करणे आवश्यक आहे, अशी मागणीही त्यांनी केली.

अशा परिस्थितीत, विशेष कायद्याची आवश्यकता असलेल्या या मागणीला महत्त्व देताना, उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आदर राखण्यासाठी सरकारला तातडीने निर्णय घेण्याची सूचना केली आहे.

राजकारण ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now