Rahul Kul: गेल्या काही दिवसांपासून नेते मंडळींवर ईडीचे धाडसत्र सुरूच आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. यादरम्यान आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहीले आहे. या पत्राद्वारे संजय राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
भीमा सहकारी साखर कारखाना हा पुणे जिल्ह्यातील दौंड येथे आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी देवेंद्र फडवणीस यांना भलं मोठं पत्र लिहिल आहे. या पत्रामध्ये त्यांनी हा भ्रष्टाचार नेमका झाला कसा? याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच हे पत्र सोशल मीडियावर देखील अपलोड केला आहे. यादरम्यान, व्हायरल होत असलेल्या या पत्रावर भाजपची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
हसन मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या राजकीय वर्तुळात धुडगूस घालत आहे. तपास यंत्रणाचे धाडसत्र सुरूच आहे. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींच्या गैरव्यवहार त्यापेक्षा भयानक आहे. या भ्रष्टाचाराला राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते खूप गंभीर आहे, असा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे.
या पत्रामध्ये तब्बल ५०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर केला आहे. हे प्रकरण ईडीने व सीबीआयच्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यातील घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
त्याचवेळी संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणारे किरीट सोमय्या भाजपातील भ्रष्टाचाराविरोधात का मूग गिळून बसलेत? असे म्हणत राऊत यांनी सोमय्या यांना डिवचले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, राहुल कुल २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. ते पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. तसेच राहुल कुल हक्कभंग कारवाईच्या समितीचे अध्यक्ष आहेत.काही दिवसांपासून संजय राऊत यांच्यावर हक्कभंग कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी हा गंभीर आरोप केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
गाडीचं छत उडालं अन् चिमुलली लेकरं थेट बाहेर फेकली, समृद्धी हायवेवर अंगावर काटा आणणारा अपघात
‘या’ दिग्गज क्रिकेटरसोबत होते माधुरी दीक्षितचे अफेअर; ब्रेकअपचं कारण ऐकून धक्का बसेल
रोहित शर्माने भर मैदानात इशान किशनवर उचलला हात; कारण ऐकून व्हाल हैराण, पहा व्हिडिओ