मोठी बातमी! मोदींच्या मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून केंद्रात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे इच्छुक खासदारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचे देखील नाव फायनल झाले असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व काहीसे कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाजपला जिल्ह्यातून ताकद मिळण्यासाठी प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रीतम मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत.

तसेच पंकजा मुंडे यांच्या त्या बहिण आहेत. आता त्यांना मंत्रिपद मिळणार का? हे लवकरच समजेल. तसेच राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे नाव देखील आघाडीवर आहे. त्यांना देखील मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. ते देखील दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत.

यामुळे आता राज्यातून कोणाकोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रीतम मुंडे यांची खासदारकीची दुसरी टर्म असून त्यांना राजकीय अनुभव देखील आहे. यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक केली. तसेच मोदींनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली. दरम्यान या फेरबदलात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव घेतले गेल्याचे सांगितले जात आहे.

प्रीतम मुंडे यांनी २०१४ ची लोकसभा पोटनिवडणूक लढवली होती. यामध्ये त्या तब्बल ६ लाख ९६ हजार ३२१ मतांच्या फरकाने जिंकल्या होत्या. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा लीड कमी झाले. तरीही प्रीतम मुंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. यामुळे त्यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा आहे.

ताज्या बातम्या

आश्चर्यच! भगवान विष्णुची सर्वात उंच मुर्ती भारतात नाही, तर ‘या’ मुस्लिम देशात आहे

जाणून घ्या दिशा पटानीच्या लव्ह स्टोरीबद्दल; टायगरच्या अगोदर टेलिव्हिजन अभिनेत्याला करत होती डेट

तु अंतर्वस्त्रे घालायला विसरलीस; हटके लुकमुळे अभिनेत्री प्रियंका उध्वानी झाली ट्रोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.