अधिकाऱ्याच्या बचावासाठी निवेदन घेऊन आलेल्यांवर नवनीत राणा भडकल्या…

मुंबई : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण या तरुण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

याच पार्श्वभूमीवर दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. तर दुसरीकडे या प्रकरणात खासदार नवनीत राणा काल चांगल्याच भडकल्याच पाहायला मिळाल्या.

वाचा काय आहे प्रकरण…
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या श्रीनिवासा रेड्डी यांनी कार्यालयातील काही महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना खासदार नवनीत राणा यांच्याकडे आपल्या बचावासाठी निवेदन घेऊन पाठविले. पण नवनीत राणा यांनी या महिला निवेदनाकर्त्यांवर चांगल्याच भडकल्या.

महिला असून सुद्धा आपण महिलेची बाजू न घेता, रेड्डी सारख्या अधिकाऱ्यांची बाजू घेत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. याचबरोबर निवेदन स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. ‘पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी रेड्डीला कडक शिक्षा झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे यावेळी नवनीत राणा यांनी सांगितले.’

दरम्यान, याआधीही कार्यालयातील पुरुष कर्मचाऱ्यांनी नवनीत राणा यांची भेट घेऊन रेड्डींना आमचा पाठिंबा नसल्याचे सांगितले आणि रेड्डी सारख्या अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

अभिनेत्री प्रिया राजवंशची गळा दाबून करण्यात आली होती हत्या; कारण ऐकूण धक्का बसेल

एक एकरात केली ‘या’ भाजीची लागवड आणि शेतकरी झाला मालामाल

सलाम या तरुणीला! गोरगरीबांवर करतेय फक्त १० रुपयांत उपचार तेही २२ हजार भाडे भरुन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.