कोरोनावरील लस १५ ऑगस्टपर्यंत उपलब्ध करण्याच्या हालचाली?; अशी केली तयारी

 

नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या संकटाने देशभरात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे.

या कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे भारतात लवकरात लवकर कोरोनावरील लस उपलब्ध करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहे.

कोरोना संसर्गावर स्वदेशात बनवलेली कोव्हॅक्सिन ही पहिली प्रतिबंधक लस स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेने (आयसीएमआर) कंबर कसली आहे.

पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि भारत बायोटेक यांच्या सहकार्याने ही लस तयार करण्यात येत आहे.

दरम्यान, कोव्हॅक्सिन या लसची माणसांवरील चाचणी ७ जुलैपासून सुरू कराव्यात असे पत्र आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी संबंधित बारा संस्थांना पाठवले आहे.

तसेच येत्या १५ ऑगस्टपासून ही लस उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.