तोंड आल्यामुळे त्रस्त आहात का? ‘हे’ उपाय करुन पाहा

मुंबई | आपल्यापैकी अनेकांना तोंड येण्याचा त्रास जाणवतो. तोंड आल्याने काही खाणं अशक्य होते. मग चांगले पदार्थ खाता येत नाही की गरम काही पिता येत नाही’. ही समस्या सर्वसामान्य असली तरीही विशेषतः तरुणांमध्ये ती जास्त प्रमाणात आढळते. असंतुलित आहार, पोट खराब असणे, पान-मसाल्यांचं सेवन यामुळे तोंड येण्याचं प्रमाण अधिक असते.

शरीरामध्ये पित्ताची मात्रा वाढली, पोट व्यवस्थित साफ होत नसेल, शरीरातील उष्णता वाढली की तोंड येण्याचा त्रास वाढतो. तोंडाच्या आतमध्ये सूज येणं, जीभेवरची त्वचा सोलली जाणं, तोंडाच्या आत गळूसारखे वा पुरळसदृष्य फोड येण्याचा त्रास दिसून येतो. हे सर्व तोंड आल्यामुळे होते.

तोंड येण्याचा त्रास होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. तोंड येण्याचा त्रास जाणवायला लागल्यावर पोषक आहार घ्या. ब जीवनसत्वाच्या गोळ्या पाच ते सात दिवस घ्या. आहारात दह्याचा समावेश करा. याचबरोबर तुरटीच्या पाण्याने चूळ भरा.

या काळात कोमट पाणी पित राहा. मुखदुर्गंधीचा त्रास जाणवत असेल तर तो रोखा. तुळशीची पानं चावून खा. महत्त्वाची बाब म्हणजे कडक, तिखट, आंबट, खारट पदार्थांचं सेवन कटाक्षाने टाळा.

साधारणपणे तोंड आलेल्या ठिकाणी तूप, मध, कोरफड लावल्यास काही प्रमाणात आराम मिळू शकतो. पण या उपायांनंतरही बरे न वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तोंड स्वच्छ राहील याची काळजी घ्यायला हवी. खाल्ल्यानंतर ब्रश करणे आवश्यक आहे. कोमट पाण्याच्या गुळण्या हाही तोंड स्वच्छ ठेवण्याचा उत्तम उपाय आहे.

महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्राच्या इतिहासातील रणरागिणी ‘छत्रपती ताराराणी’ साकारणार सोनाली कुलकर्णी; पहा फस्ट लुक
अमित शहा नेपाळ व श्रीलंकेतही भाजपचे सरकार आणणार आहेत; भाजप मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे
फोनचा पासवर्ड विसरलात? ‘या’ काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करून क्षणात करा अनलॉक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.