मुंबई पोलिसांनी दिंडोशी परिसरात एका कचराकुंडीतून दहा तोळे सोने जप्त केले आहे. पोलिसांना हे सोने शोधण्यात चक्क उंदराने मदत केली आहे. एका महिलेने एका भिकारी स्त्रीला पिशवीत खाण्यासाठी पाव दिला होता. पण भिकारी स्त्रीने तो कोरडा पाव असलेली पिशवी कचराकुंडीत फेकून दिली होती. (mouse help mumbai police for finding gold bag )
या पिशवीत सुमारे दहा तोळे सोने होते. त्याची किंमत तब्बल पाच लाख रुपये होती. गेल्या काही दिवसांपासून पोलीस दागिने असलेल्या पिशवीचा शोध घेत होते. यावेळी कचराकुंडीजवळ असलेल्या सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना ती पिशवी एक उंदराजवळ असल्याचे दिसले. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी सोन्याचे दागिने असलेली पिशवी शोधली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरे कॉलनी परिसरात राहणारी सुंदरी नावाची महिला आपल्या मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी दागिने गहाण ठेवण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ दहा तोळे सोने होते. दागिने गहाण ठेवण्यासाठी जात असताना वाटेत त्यांना एक भिकारी स्त्री आणि तिचा मुलगा दिसला.
यावेळी सुंदरी यांनी आपल्याजवळ असलेला पाव त्या भिकारी महिलेला खाण्यासाठी दिला. यावेळी सुंदरी यांनी पिशवीमध्ये तो पाव दिला होता. पाव कोरडा असल्यामुळे भिकारी महिलेने ती पिशवी कचराकुंडीत फेकून दिली. या पिशवीमध्ये दहा तोळे सोने होते. बँकेत गेल्यानंतर सोन्याच्या दागिन्यांची पिशवी विसरल्याचे सुंदरी यांच्या लक्षात आले.
त्यानंतर सुंदरी त्या भिकारी महिलेकडे परत आल्या. सुंदरी यांनी दागिन्यांच्या पिशवीबद्दल त्या भिकारी महिलेला विचारले. त्यावर तिने ती पिशवी कचराकुंडीत फेकली असल्याचे सांगितले. त्यानंतर सुंदरी यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला.
त्यावेळी पोलिसांनी कचराकुंडीजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज देखील तपासले. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये ती दागिन्यांची पिशवी उंदराच्या ताब्यात असल्याचे दिसून आले. उंदराने ती पिशवी कचराकुंडीजवळ असणाऱ्या नाल्यात नेली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दागिन्यांच्या पिशवीचा शोध लावला. त्यानंतर पोलिसांनी दागिन्यांची पिशवी सुंदरी यांच्याकडे सोपविली.
महत्वाच्या बातम्या :-
तब्बल ३० तास चौकशी: ईडीच्या कठीण प्रश्नांवर राहुल गांधींनी दिली ही उत्तरं, म्हणाले…
या दिग्गज अभिनेत्याच्या पत्नीने केली भारतरत्नची मागणी, म्हणाली, ‘तो कोहिनूर होता, त्याला भारतरत्न द्या’
गौतम गंभीरचं धक्कादायक विधान, म्हणाला, केएल राहुलने टी-२० वर्ल्डकपमध्ये…