टेलिव्हिजनवर काम केल्यानंतर अनेक अभिनेत्री बॉलीवूडमध्ये नाव कमवण्यासाठी जातात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे मोनी रॉय. टेलिव्हिजनवर अनेक मालिकांमध्ये काम केल्यानंतर मोनीने बॉलीवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मोनीने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. तिने मालिकेतून तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात केली. ‘देवों के देव महादेव’ मालिकेत मोनीने महत्वाची भुमिका साकारली होती. ही मालिका खुप प्रसिद्ध झाली होती.
पण मोनीला खरी ओळख ‘नागिन’ मालिकेतून मिळाली होती. या मालिकेमूळे तिला घराघरात ओळख निर्माण झाली होती. तिने मालिकेच्या दोन सीजनमध्ये काम केले होते. या मालिकेत तिचा अभिनय पाहून तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या होत्या.
तिने अभय कुमारसोबत ‘गोल्ड’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. हा चित्रपट काही खास जादू करु शकला नाही. पण मोनीला मात्र चांगलीच ओळख मिळाली. तिला अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर आल्या. ती लवकरच रणबीर कपूरसोबत एका चित्रपटामध्ये दिसणार आहे.
मोनी तिच्या सौंदर्यामूळे नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी तिचे असेच काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये ती ब्लॅक ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
पण या फोटोंमूळे मोनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील झाले आहे. या वेळेस ती कपड्यांमूळे नाही तर फिगरमूळे ट्रोल झाली आहे. ती तिच्या झिरो फिगरमूळे नेहमीच चर्चेत असते. या वेळेस मात्र लोकांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.
मोनी ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये तिच्या डान्स क्लासच्या बाहेर दिसली होती. मोनी ब्लॅक ड्रेसमध्ये खुपच हॉट दिसत आहे. या फोटो पाहून काही लोकांनी तिला तिच्या फिगरसाठी ट्रोल केले आहे. एक युजर म्हणाला की, मॅडम काही तरी खात जा.
दुसरा युजर म्हणाली की, ‘अरेरे ही तर हवा आल्यानंतर लगेच उडून जाईल’. अजून एक युजर म्हणाला की, ‘फिगर नीट ठेवण्यासाठी मोनी रॉय उपाशी राहते. त्यामूळेच काहीही केले. तरी तिचे वजन वाढत नाही. मॅडम जेवण करत जा’.
महत्वाच्या बातम्या –
एकमेकांच्या प्रेमात पडायच्या आधी काजोलचे आणि अजय देवगनचे दुसरीकडेच लफडे सुरू होते
मधूबाला ‘या’ विवाहीत दिग्दर्शकाच्या प्रेमात पागल झाल्या होत्या; घेतला होता लग्न करण्याचा निर्णय
‘या’ व्यक्तिच्या प्रेमात पागल झाली होती एकता; २२ व्या वर्षी घेतला होता लग्न करण्याचा निर्णय