चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या मयुरवर बक्षीसांचा वर्षाव! जावाने दिली मोटारसायकल

बदलापुर | दोन दिवसांपुर्वी वांगणी रेल्वे स्टेशनवर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावत जावून एका चिमुकल्याचा जीव  पाँईंटमन मयुर शेळकेने वाचवला होता. धाडस करत भरधाव वेगात असलेल्या रेल्वेसमोर जाऊन ६ वर्षाच्या चिमुकल्याचा जीव वाचवल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

अनेक राजकीय नेत्यांनी, सोशल मिडिया युजर्सनी मयुरचे कौतूक केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत मयुरचा सन्मान करणार असल्याचं म्हणलं होतं. मनसे आमदार राजू पाटील यांनीही मयुरला शाल श्रीफळ देत सन्मान केला होता. ज्या मुलाला मयुरने वाचवले होते त्या मुलाच्या अंध मातेनेही मयुरला पुरस्कार देऊन सन्मान करा. त्याच्यामुळेच माझा आधार जीवंत राहिला असं म्हटलं होतं.

मयुरच्या धाडसाचे राज्यात नाही तर संपुर्ण देशभरात कौतूक होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फोन करून तुमचे कौतूक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. कल्पनेच्या पलिकडे तुम्ही काम केले आहे असं म्हणत कौतूक केले आहे.

मयुरचा रेल्वे मंत्रालयातर्फे ५० हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला आहे. रेल्वे अधिकाऱ्याने याबाबत एक पत्र मुंबईच्या मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजरला लिहले आहे. आता मयुरचा जावा कंपनीकडून शानदार मोटरसायकल देऊन सन्मान करण्यात येणार आहे.  जावा हिरोजच्या माध्यमातून आम्ही त्यांचा गौरव करू इच्छितो, असं ट्विट अनुपम थरेजा यांनी केलं आहे.

नेमकं या घडलं होतं…
रेल्वे स्थानकावर एक महिला आपल्या छोट्या मुलाला घेऊन रेल्व ट्रॅकच्या कडेने चालली होती. तेवढ्यात मुलगा रेल्वे रुळावर पडतो. महिलेला डोळ्यांनी दिसत नव्हते. मुलाला वाचवण्यासाठी ती मोठमोठ्याने ओरडत होती.

मुलगा सुध्दा जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. तेवढ्यात भरधाव वेगात रेल्वे आली. त्या ठिकाणी  कर्तव्य बजावत असलेले कर्मचारी मयुर शेळके यांना मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडला असल्याचं दिसलं आणि त्यांनी मुलाला वाचवण्यासाठी जोरात धाव घेतली आणि त्या मुलाचा जीव वाचवला.
महत्वाच्या बातम्या-
कोवीड सेंटरसाठी माझी १४ एकर शेती घ्या पण कोवीड सेंटर उभारा; शेतकऱ्याची आर्त हाक
राज्यात उद्यापासून कडक लाॅकडाऊन; मुख्यमंत्री जाहीर करणार आणखी कठोर नियम
ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून आव्हाडांच्या पत्नी संतापल्या; राष्ट्रवादीच्या मदतीला मनसे धावली
बाॅक्सरचा तो व्हिडीओ पाहून महींद्रा झाले फिदा; केली स्टार्टअपसाठी मदत करण्याची घोषणा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.