दरवर्षी दिवाळीत वापरल्या जाणाऱ्या मोती साबणाचा इतिहास तुम्हाला माहितीये? जाणून घ्या सविस्तर

मुंबई|  दिवाळी सण आपल्याकडे सर्वात मोठा सण असतो. तसेच भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवांचे अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येकाच्या सण आणि उत्सवाला साजरा करण्याच्या निरनिराळ्या पद्धती असतात. याचबरोबर आपल्याकडे दिवाळी आणि मोती साबण याचे समीकरणच वेगळे आहे.

‘‘उठा उठा दिवाळी आली… मोती स्नानाची वेळ झाली’’ असं म्हणत दिवाळीच्या मंगल पर्वाला जोडलेला अविभाज्य घटक म्हणजे मोती साबण. मात्र या मोती साबणाचा इतिहास नेमका काय आहे? तसेच मोती साबणाची जन्म कहाणी काय आहे?याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

टॉमको अर्थात टाटा ऑइल मिल्सने सत्तरच्या दशकात मोती साबणाची निर्मिती केली. तसेच हा साबण अनेक अर्थाने वेगळा होता. चौकोनी वडय़ांच्या आकारात येणाऱ्या साबणांच्या काळात मोती आकाराने मोठा आणि गोल होता. याचबरोबर मोती या नावाला साजेसा आकार त्याला जाणीवपूर्वक देण्यात आला होता.

याचबरोबर गुलाब, चंदन सुगंधात उपलब्ध असलेल्या या साबणाने सुरुवातीपासून मन जिंकली होती. त्या काळाच्या त्याची २५ रु किंमत तुलनेत अधिक होती. या साबणाने सतत स्वत:ला उच्च आवडीनिवडीशी, दिव्यानुभवाशी आणि मोती या संकल्पनेशी जोडून ठेवले होते.

मात्र १९९३ साली टॉमको कंपनी हिंदुस्थान लिव्हर कंपनीत समाविष्ट झाली आणि हिंदुस्थान लिव्हरने हा साबण विशिष्ट प्रसंगी वापरायलाच हवा या संकल्पनेशी जोडला. विशेषतः दिवाळीच्या अभ्यंगस्नाना साठी मोती हा साबण वापरला जातो असे बिंबवले गेले.

या अगोदर बाराही महिने बाजारपेठांमध्ये उपलब्ध असलेल्या मोती साबण ला आता केवळ दिवाळीच्या अभ्यंगस्नाना साठी वापरल्या जाणा-या साबणाचे स्थान प्राप्त झाले.२०१३ मध्ये हिंदुस्तान लिव्हर कंपनीने पुन्हा मोती साबण बाजारपेठेमध्ये प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले व यावेळी उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली असे टँग लाईन घेत मोती साबण पुन्हा एकदा सर्वतोमुखी केला.

दरम्यान , आज दिवाळी आणि मोतीसाबण हे समीकरण अभेद्य आहे. उटणं, सुवासिक द्रव्य अभ्यंगस्नानात आपापल्या परीने काम करत असूनही मोती साबणाशिवाय हे स्नान अपूर्ण वाटावे इतपत या ब्रॅण्डने दिवाळीशी नात जुळवून घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
अंतिम सामन्यापुर्वी वाढली रोहितची चिंता; हुकमी एक्का जखमी
ब्लॅक चित्रपटासाठी अमिताभ बच्चनने फुकट काम केले होते; कारण ऐकल्यावर अभिमान वाटेल
‘मैने प्यार किया’ फेम भाग्यश्रीसाठी वेडा झाला होता बाहुबली प्रभास
अशी गाजली होती विनोद मेहरा आणि रेखाची लव्हस्टोरी; शेवट मात्र दुर्दैवी
…म्हणून मला बॉलीवूडच्या मोठ्या मोठ्या पार्ट्यांमध्ये बोलवले जात नाही; गोविंदाने सांगितले सत्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.